माजी आमदार दिलीप माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजप प्रवेशाची तयारी सुरू केली असून, मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना सहकार्य आणि पाठिंब्याचे आश्वासन दिले आहे.
माने यांनी सांगितले की त्यांच्या प्रवेशानंतर मुख्यमंत्री फडणवीस शेतकरी मेळाव्याला सहभागी होणार आहेत.
सुभाष देशमुख यांच्याशी असलेले मतभेद दूर करून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय माने यांनी घेतला असून, कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील दिशा ठरवणार आहेत.
Solapur, 17 October : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गुरुवारी (ता. १७ ऑक्टोबर) रात्री आमची बैठक झाली. यापूर्वी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी अनेकवेळा आमची चर्चा झाली आहे. दक्षिण सोलापूरमधील भाजपचे लोकप्रतिनिधी (आमदार सुभाष देशमुख) यांची माझ्यासंदर्भात काही अडचण आहे का? याचीही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी सहकार्य राहील, असा शब्द दिला आहे, त्यामुळे पहिल्यांदा मुंबईत भाजप कार्यालयात प्रवेश होईल आणि त्यानंतर शेतकरी मेळाव्याला मुख्यमंत्री येतील, असे माजी आमदार दिलीप माने यांनी सांगितले.
माजी आमदार तथा राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने, माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे दोन्ही चिरंजीव रणजित आणि विक्रम शिंदे आणि मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून भेटीचा निरोप आला होता. त्यानुसार आम्ही फडणवीस यांना भेटायला गेलो होतो, असे दिलीप माने (Dilip Mane) यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री यांच्याजवळ आलो. दुहेरी पाईपलाईन, विमानसेवा या आमच्या मागण्या मान्य झाल्या आहेत, त्यासोबतच आयटी पार्क आणण्याचाही शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला आहे.
सध्या आम्ही विरोधी पक्षात आणि सत्ताधारी पक्षातही नाही, अशी आमची परिस्थिती होती, त्यामुळे कार्यकर्त्यांसाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आम्हाला भूमिका घेणं भाग आहे. मी काही कॉन्ट्रॅक्टर नाही. पालकमंत्री जयकुमार गोरे हे माझे मित्र आहेत आणि मुख्यमंत्र्यांची भूमिका मला रास्त वाटली. त्यामुळे आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, असे माजी आमदार माने यांनी स्पष्ट केले.
माझ्या मतदारसंघातील (दक्षिण सोलापूर) लोकप्रतिनिधीला (आमदार सुभाष देशमुख) माझ्याशी काही अडचण आहे का? यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. मुख्यमंत्री सांगतील त्याच पद्धतीने मी काम करेल. मुख्यमंत्र्यांनी माझं सहकार्य आणि पाठिंबा राहील, असं सांगितलं आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांशी संवाद साधून आम्ही पुढील निर्णय घेऊ, असे दिलीप माने यांनी नमूद केले.
माने म्हणाले, माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे दोन्ही चिरंजीव रणजित आणि विक्रम हे त्यांच्या वडिलांना विचारूनच मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला येण्याचं कबूल केलं आहे, तेव्हा आम्ही निर्णय घेऊ. आपण खूप वेळ थांबला की कार्यकर्ते आपल्या जवळ थांबत नाहीत.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा करा, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मला सांगितलं आहे. अगोदर मुंबईतील पक्ष कार्यालयात प्रवेश करा आणि त्यानंतर मुख्यमंत्री हे आपल्या मेळाव्याला येतील. भाजपचा स्थानिक आमदार माझ्या मतदारसंघात आहे, त्याची कल्पना मी मुख्यमंत्र्यांना दिली आहे. मात्र, पक्षवाढीसाठी मला प्रवेश दिला जाणार आहे, अडचण आली तर सोडवली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे, असेही माने यांनी सांगितले.
Q1. दिलीप माने यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना का भेटले?
भाजप प्रवेश आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांवरील रणनीतीसाठी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केली.
Q2. फडणवीस यांनी माने यांना काय आश्वासन दिले?
त्यांना पूर्ण सहकार्य आणि कार्यकर्त्यांसाठी पाठिंबा राहील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Q3. कोणते विकास प्रकल्प चर्चेत आले?
दुहेरी पाइपलाइन, विमानसेवा आणि आयटी पार्क स्थापनेबाबत चर्चा झाली.
Q4. माने यांचा भाजप प्रवेश कधी होणार आहे?
मुंबईतील भाजप कार्यालयात लवकरच प्रवेश होईल, त्यानंतर शेतकरी मेळावा होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.