Solapur Politic's : सोलापूर विमानतळावरच फडणवीस-कल्याणशेट्टी अन॒ माने यांची चर्चा; दिलीप मानेंची भाजपशी जवळीक वाढली!

Sachin Kalyanshetti-Dilip Mane Meet Devendra Fadnavis : बाजार समितीच्या निवडणुकीपासून माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू आहे. त्याबाबत माने यांनी अद्याप अवाक्षरही काढले नाही. मात्र, त्यांच्या भाजप नेत्यांसोबतच्या गाठीभेटीही वाढल्या आहेत.
Dilip Mane-Devendra Fadnavis-Sachin Kalyanshetti
Dilip Mane-Devendra Fadnavis-Sachin KalyanshettiSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 06 July : काँग्रेसचे माजी आमदार तथा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी आज (ता. 06 जुलै) दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोलापूर विमानतळावर भेट घेतली. विमानतळावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि दिलीप माने यांच्यात गंभीर चर्चा झाल्याचे माध्यमांमध्ये व्हायरल झालेल्या फोटोंवरून दिसून येत आहे. या भेटीची सोलापूरच्या राजकीय क्षेत्रात चर्चा रंगली असून त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली असावी, याची उत्सुकता सोलापूरकरांना आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane) आणि सुरेश हसापुरे यांच्याशी हातमिळवणी करून पॅनेल उभे केले होते. काँग्रेस नेत्यांशी केलेली हातमिळवणी न पटल्याने माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी एकत्र येऊन बाजार समितीची निवडणूक लढवली होती.

बाजार समितीच्या निवडणुकीचे सर्व अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कल्याणशेट्टी यांना दिले आहेत, असे त्यावेळी सांगण्यात येत होते. त्यामुळे भाजपचे दोन वरिष्ठ आमदार सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख हे नाराज झाले होते. त्या निवडणुकीपासून भाजपचे दोन्ही वरिष्ठ आमदार पक्षाच्या एकाही जायला तयार नाहीत. अनेक वरिष्ठ मंत्र्यांचा आणि नेत्यांचा दौरा होऊनही या दोघांनी त्या कार्यक्रमांकडे पाठ फिरवली. सुभाष देशमुख यांची तर मंत्र्यांनी घरी येऊन भेट घेतली होती. मात्र, या दोन्ही देशमुखांची नाराजी दूर होऊ शकली नाही.

Dilip Mane-Devendra Fadnavis-Sachin Kalyanshetti
Dilip Mane-Devendra Fadnavis-Sachin KalyanshettiSarkarnama

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आषाढीनिमित्त विठ्ठलाची महापुजा करण्यासाठी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. ते शनिवारी मुंबईहून सोलापूरच्या विमाळतळावर आले होते, तेथून ते पांडुरंगाची शासकीय महापूजा करण्यासाठी पंढरपूरला गेले होते. त्यावेळी फडणवीसांच्या स्वागतासाठी दोन्ही देशमुख हजर होते. मात्र, पंढरपूरहून परत जाताना देवेंद्र फडणवीस हे रविवारी (ता. 06 जुलै) सोलापूर विमानतळावर आले होते.

Dilip Mane-Devendra Fadnavis-Sachin Kalyanshetti
Fadnavis On Pandharpur Corridor : आमदार समाधान आवताडेंच्या समोरच पंढरपूर कॉरिडॉरबाबत मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान....

सोलापूरच्या विमानतळावर फडणवीसांच्या स्वागतासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, बाजार समितीचे सभापती दिलीप माने हे उपस्थित होते. कल्याणशेट्टी, कोठे आणि माने यांनी स्वागत केले. त्यानंतर विमानतळावरच फडणवीस, कल्याणशेट्टी आणि दिलीप माने यांच्यात चर्चा रंगली होती. त्याबाबतचे फोटो सोशल मीडियातून व्हायरल झाले आहेत. त्या फोटोवरून या तिघांमध्ये गंभीर विषयावर चर्चा झाल्याचे दिसून येत आहे.

कल्याणशेट्टी आणि माने यांची फडणवीस तिघांमध्ये बराच वेळ विमातळावर चर्चा सुरू होती. त्यावेळी माजी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी हे अंतरावर उभे होते. या तिघांमधील चर्चेचा तपशील मात्र समजू शकलेला नाही. या तिघांमधील चर्चेची उत्सुकता सोलापूकरांना लागली आहे.

बाजार समितीच्या निवडणुकीपासून माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू आहे. मात्र, त्याबाबत माने यांनी अद्याप अवाक्षरही काढले नाही. मात्र, त्यांच्या भाजप नेत्यांसाोबतच्या गाठीभेटीही वाढल्या आहेत. त्या संदर्भात विमानतळावर या तिघांमध्ये चर्चा झाली की काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

Dilip Mane-Devendra Fadnavis-Sachin Kalyanshetti
Laxman Hake : लक्ष्मण हाकेंच्या विरोधात राष्ट्रवादीचे कायदेशीर पाऊल; ‘सात दिवसांत माफी मागा; अन्यथा...’

माजी आमदार दिलीप माने हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. महाविकास आघाडीचे सरकार असताना आणि त्यानंतर महायुतीचे सरकार आल्यानंतरही माने यांनी अजित पवार यांच्यासोबत अनेकदा गाठीभेटी घेतल्या आहेत, त्यामुळे माने हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार की भाजपमध्ये प्रवेश करणार, याबाबतची उत्सुकता सोलापूरकरांना लागून राहिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com