Eknath Shinde-Sadabhau Khot Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Politics : मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला सरकारमध्ये किंमत आहे का?; सदाभाऊंचा सवाल

हेमंत पवार

Karad News : दोन साखर कारखान्यांतील हवाई अंतराची अट सरकारने काढून टाकावी, अशी आमची मागणी होती. त्यासाठी समिती नेमायची मुख्यमंत्र्यांनी ठरवले होते. ती समिती कुठपर्यंत आली आहे, ती समिती नेमली जाणार आहे की नाही? याची माहितीच दिली जात नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला सरकारमध्ये किंमत आहे की नाही? असा सवाल माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला. (Does the Chief Minister's word have value in the government?)

महाराष्ट्र हे कृषिप्रधान राज्य असूनही राज्याला पणन मंत्री कोण, हे माहिती नसावे हे महाराष्ट्राचं दुर्दैवच आहे, असाही टोला त्यांनी लागावत सरकारला घरचा आहेर दिला आहे. रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शासकीय विश्रामगृहासमोर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सरकारवरच टीका केली. या वेळी संघटनेचे नेते सचिन नलवडे, पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यात साखर कारखान्यांना हवाई अंतराची अट होती. दोन साखर कारखान्यांतील हवाई अंतराची ही अट सरकारने काढून टाकावे, अशी आमची मागणी होती. ही अटक काढून टाकण्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला दिला होता. त्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी समिती नेमायची ठरवली होती. ती समिती कुठपर्यंत आली आहे, ती समिती नेमली जाणार आहे की नाही, याची माहितीच दिली जात नाही. त्यामुळे राज्याच्या सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला किंमत आहे की नाही? याची शंका येते, असा टोमणा खोत यांनी लगावला.

आपले राज्य कृषिप्रधान असूनही राज्याला पणन मंत्री हा नेमका कोण आहे, हेच माहिती नाही. हे महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल. या राज्याच्या पणन मंत्र्यांनी पुढे येऊन ते शेतकऱ्यांसाठी काय करत आहेत, हे सांगावे. त्यातून पणन खात्याला कोण मंत्री आहे हे तरी समजेल. असा टोला पणन मंत्र्यांना लगावून खोत यांनी सरकारला अर्थात शिंदे गटाला घरचा आहेर दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT