Solapur, 03 March : परळी बाजार समितीचे माजी सभापती आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय सहकारी गोविंद फड यांनी फेसबुक पोस्ट करत ‘धनंजय मुंडे यांच्या केसाला जरी धक्का लागला तर कार्यक्रम खल्लास.. जरांगे, सुरेश धस भंडारा लावून बोलतोय’ अशी धमकी दिली होती. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पलटवार करताना ‘तू फक्त धमक्या देऊ नको, कोणत्याही गावात ये, असे उघड चॅलेंज दिले आहे.
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे सोलापूर जिल्ह्यातील वडकुते गावात आले होते. त्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी गोविंद फड यांना प्रतिआव्हान दिले आहे. ते म्हणाले, तुम्ही सगळे माझे संबंधी आहात, मी माझ्या आयुष्यात स्वतःसाठी एक रुपयाही कमावलेला नाही. त्यामुळे मी आणि माझं कुटुंब डावावर लागलंय.
मला आणि माझ्या कुटुंबाला कधी मारून टाकतील, हे माहितीसुद्धा नाही. तरीही मी हटत नाही. समाजासाठी रात्रंदिवस बाहेर आहे. कुणाला यायचं त्याला येऊ द्या. आम्ही मराठे तुझ्याशी लढायला समर्थ आहोत. तू कोणत्याही गावात ये, प्रत्येक गावात माझा मराठा आहे. फक्त तू ये, धमक्या देऊ नको. ह्यावं करणार आणि त्यावं करणार आहे, असे सांगून त्यांनी गोविंद फड (Govind Phad) याला सुनावले.
जरांगे पाटील म्हणाले, काल सकाळी कुणीतरी धमकी दिलेले मला सकाळी कळाले. त्या धन्याचं (धनंजय मुंडे) कोणीतरी... त्या खरकट्याचं कोणी तरी आलतं ना पुढे. ते म्हणालं, भंडारा लावून मला मारून टाकतो. तू भंडारा लाव नाही तर XXX लाव. तू काहीही लाव. का मारायचं मला? मी तर गरिबांचं काम करतोय. गरीबांची लेकरं उभी करतो, हेच कारण आहे ना. अरे गेल्या दोन वर्षांत असे कित्येक आलेत आणि वाऱ्यासारखे उडून गेलेत, तू कोण आहेस. कुठला लागून गेलाय.
मराठा समाजाने एकजुटीनं राहावं, खूप मोठ्या संघर्षाला समाजाला समोरे जायचे आहे. मी मरायला भीत नाही, माझी कधीही मरायची तयारी आहे. माझा समाजही सज्ज आहे. पण समाजाला माझी हात जोडून सर्वांना विनंती आहे, तुम्ही सर्वांनी एकजूट राहा.
आपली शक्ती आपल्याच विरोधात वाया घालवू नका. एकमेकांच्या विरोधात रक्त सांडायचं नाही. एकमेकांना सहकार्य करायचं शिका. एखाद्याला गाडी नसेल तर गाडी द्यायची. कुणाला अडअडचणी आल्या तर त्याच्या मदतीला ताबडतोब जायचं. एकमेकांना सहकार्य करायचं शिका, असे आवाहनही जरांगे यांनी मराठा समाजाला केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.