Manoj Jarange Patil : मंत्रालयातून माझ्याविरोधात कट : गृहविभाग कामाला लागलाय, स्टिंग ऑपरेशनही सुरू; मनोज जरांगे पाटील यांचा नवा दावा

Dhananjay Munde Allegation controversy : मनोज जरांगे पाटील यांनी मंत्रालयातून आपल्या विरोधात कट रचला जात असल्याचा दावा केला आहे. गृहविभागही यात सामील असल्याचा आरोप करत त्यांनी स्टिंग ऑपरेशन सुरू असल्याचे सांगितले.
Maratha reservation activist Manoj Jarange Patil addressing a public gathering, alleging a conspiracy from Mantralaya and fresh developments in the Dhananjay Munde controversy.
Maratha reservation activist Manoj Jarange Patil addressing a public gathering, alleging a conspiracy from Mantralaya and fresh developments in the Dhananjay Munde controversy.Sarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येची सुपारी दिली होती, असा आरोप करत मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरात खळबळ उडवून दिली होती. या आरोपात किती तथ्य आहे हे समोर येण्याआधीच आता जरांगे पाटील यांनी नवा आरोप करत आपल्याविरोधात थेट मंत्रालयातून कट रचला जात असल्याचा दावा केला आहे. गृहविभागही कामाला लागले आहे, या कटाची माहिती आपण काढली असून त्यात तथ्य आढळून आल्याचे जरांगे पाटील म्हणाले.

मंत्रालयातून रचल्या जात असलेल्या कटाची माहिती आपल्या त्याठीकाणी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने दिली आहे. 1 ते 6 फेब्रुवारी दरम्यान, हा कट रचला गेला आहे. मी समाजासाठी, गोरगरिबांसाठी काम करतो हे त्यांना पहावत नाही. पण मी देखील काही कमी नाही. या कटाची माहिती काढण्यासाठी मी आपले काही लोक कामाला लावले होते. त्यांनी कट केला जात असल्याच्या आरोपाला दुजोरा दिला आहे. पण त्यांचा हा डाव मी हाणून पाडणार, असा दावाही जरांगे पाटील यांनी केला आहे.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काही महिन्यापूर्वी माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी आपल्या हत्येचा कट रचल्याचा आरोप करत त्यांची आणि माझी नार्को टेस्ट करा, ब्रेन मॅपिंग करा, अशी मागणी केली होती. या प्रकरणात ज्या आरोपींना पोलीसांनी अटक केली होती, त्यांनीही आता मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात समोर येत काही आरोप केले आहेत.

Maratha reservation activist Manoj Jarange Patil addressing a public gathering, alleging a conspiracy from Mantralaya and fresh developments in the Dhananjay Munde controversy.
Beed Crime News : बीड न्यायालयात राडा, महिलेसह दोघांनी वकीलाला झोडपले; वादाचे कारण ठरली दुचाकी

हे प्रकरण तापत असतानाच आता मनोज जरांगे पाटील यांनी आणखी एका कटाबद्दल भाष्य करत खळबळ उडवून दिली आहे. एका जाहीर कार्यक्रमात मनोज जरांगे पाटील यांनी मंत्रालयात आपल्या विरोधात कट रचला जात असल्याचा आरोप केला. एका महिलेचाही यात समावेश आहे. मंत्रालायतील एका दालनात झालेल्या बैठकीत केव्हा, कधी? काय करायचे हे सर्व ठरले आहे.

Maratha reservation activist Manoj Jarange Patil addressing a public gathering, alleging a conspiracy from Mantralaya and fresh developments in the Dhananjay Munde controversy.
Beed News : बीडला 'मुंडें'च्या हाती लागू न देण्यासाठी धस-क्षीरसागरांची धावपळ : थेट CM फडणवीसांची घेतली भेट; धनंजय देशमुखांनाही घेतलं सोबत

यासाठी सध्या स्टिंग आॅपरेशनही केले जात आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी मी जाहीर बोलत नाही. पण हा कट आणि तो रचणाऱ्यांचा डाव आपण हाणून पाडू, असा दावाही मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. काहीही झाले, कितीही कट, षडयंत्र रचले तरी मी समाजासाठी लढत राहणार, मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com