Prajakta Tanpure

 
Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

'तुमचे व्हिडिओ बाहेर काढण्याची वेळ येऊ देऊ नका'

शिवसेना ( Shivsena ) नेत्याच्या बचावात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) मंत्री प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) आले आहे.

Amit Awari

अहमदनगर : नगर तालुक्यातील शिवसेनेच्या एका नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. त्या नेत्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. हा प्रकार राजकीय हेतूने करण्यात येत असून हा व्हिडिओ बनावट आहे. असे त्या नेत्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. या शिवसेना ( Shivsena ) नेत्याच्या बचावात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) मंत्री प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) आले आहेत. 'Don't let the time come for your videos to come out'

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज्यमंत्री तनपुरे बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच काशिनाथ पाटील गावंडे होते.

प्राजक्त तनपुरे म्हणाले, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याला त्रास देण्याचा अथवा बदनाम करण्याचा प्रयत्न झाल्यास विरोधकांनाही घराबाहेर पडण्याची हिंमत होणार नाही. विकृत विचाराने केवळ विरोधकांना बदनाम करण्याचा प्रयत्न केल्यास राहुरी तालुक्यातील तुमचे पण व्हिडिओ बाहेर काढण्याची वेळ येऊ देऊ नका अशी टीका मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली.

तनपुरे म्हणाले, मतदार संघाच्या विकास कामासाठी भरपूर निधी आणण्याचे काम व सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मला वेळ कमी पडतोय. त्यामुळे विरोधकांकडे लक्ष देण्यास देखील वेळ मिळत नाही. काही लोकांच्या डोक्यात नेहमी घाणेरडे विकृत विचार येतात. त्यांना जनतेने डोक्यावर अपटवले तरी देखील यांचे विचार बदलत नाहीत, असे म्हणत तिसगावच्या पिण्याचा प्रश्न मीच मार्गी लावणार. तिसगावकरांनी निचिंत राहावे, असे आश्वासनही तनपुरे यांनी दिले.

तिसगाव व निवडुंगे एका फिडरवर व शिरापूर करडवाडी मढी दुसऱ्या फिडरवर टाकून पाचही गावांना पूर्ण दाबाने शेती पंपाला वीज पुरवठा करण्यासाठी या फिडरचे काम सुरू आहे. लवकरच हे काम पूर्ण होणार आहे. मिरी तिसगाव प्रादेशिक नळ योजनेतून काही गावांच्या मागणीवरून त्यांची गाव या योजनेतून वगळली जाणार आहेत. तर पाच ते सहा गावांचा नव्याने या योजनेत समावेश केला जाणार असल्याचे मंत्री तनपुरे म्हणाले.

सरपंच लवांडे पाटील म्हणाले, मला कोणी भीती दाखवण्याची गरज नाही. तुमच्यासमोर लढण्यास मी अजून खंबीरपणे तयार आहे. मी अजून राजकारणातून संन्यास घेतलेला नाही. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अल्पसंख्यांक, बहुजन समाजाच्या हिताचे आहे. कोणी कितीही म्हणत असले हे सरकार पडणार. तर मी म्हणेन पुढच्या पंचवार्षिकला देखील महाविकास आघाडीचेच सरकार राज्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT