Solapur, 18 February : विखे पाटीलसाहेब, सांगोल्याचं राजकारण वेगळं आहे. तुमच्या हेलिकॉप्टरची वाट बघत आम्ही चौघं गाडीत बसलो होतो. दुपारची वेळ होती, आम्ही सगळे उपाशी होतो, त्यामुळे कडाडून भूक लागली होती. त्यावेळी आमदार बाबासाहेब देशमुख यांनी त्यांच्या गाडीतला डबा देऊन आम्हा सर्वांना जेवायला घातलं. असं हे सांगोल्याचं राजकारण आहे, सांगोल्याची ही राजकीय संस्कृती महाराष्ट्रात कुठं बघायला मिळत नाही, असा किस्सा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितला.
सांगोला तालुक्यातील चिकमहूद येथे (स्व.) बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्या कार्यक्रमात बोलताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) यांनी हेलिपॅडवर घडलेला किस्सा सांगितला. कार्यक्रमास पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजीबापू पाटील उपस्थित होते.
ते म्हणाले, विखे पाटीलसाहेब, तुमच्या हेलिकॉप्टरची वाट बघत आम्ही गाडीत बसलो होतो. शहाजीबापूंनी त्यांचं घड्याळ दीकपआबांना दिलं. माझ्याकडं बघितलं, माझं घड्याळ शहाजीबापूंना काढून दिलं. दीपकआबांचा चष्मा मला दिला. आम्ही सगळे उपाशी होतो; म्हणून आमदार बाबासाहेब देशमुख (Babasaheb Deshmukh) यांनी त्यांच्या गाडीतला डबा देऊन आम्हाला सर्वांना जेवायला घातलं. ही सांगोल्याची संस्कृती आहे.
आमची गंमतीनं चर्चा सुरू होती. आपण चौघंच गाडीत बसलोय. लोक काय म्हणतील बघा. त्यावर मी म्हटलं, लोक काही म्हणत नाहीत, लोकांना सगळं समजतं. निवडणूक संपल्यानंतर सर्व राजकीय नेते एकमेकांचा सन्मान करतात आणि एकमेकांना जेवायला घालतात. संपूर्ण महाराष्ट्रात असं व्हायला पाहिजे. निवडणूक संपली की वैरत्व, टीका टिपण्णी संपली पाहिजे. ही परंपरा (स्व.) आबासाहेब, बापूंनी सांगोला तालुक्यात घालून दिलेली आहे.
दरम्यान, हेलिपॅडवरून कार्यक्रमस्थळी येताना पालकमंत्री गोरे, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजी पाटील, दीपक साळुंखे हे सर्वजण एकाच गाडीतून एकत्र आले होते.
‘रणजितसिंह निंबाळकर तोपर्यंत सत्कार घेणार नाही’
नीरा देवघर प्रकल्पातून सांगोला तालुक्याच्या हक्काचे पाणी मंजूर करून घेण्यासाठी संघर्ष करणारे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर हे प्रत्यक्ष या प्रकल्पातून पाणी येत नाही, तोपर्यंत सत्कार स्वीकारत नाहीत, अशी आठवण शहाजी पाटील यांनी करून दिली. नीरा देवघर प्रकल्पाचे पाणी मिळाल्यानंतर या तालुक्यातील कालवे बारमाही होणार आहेत, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.