Solapur, 20 May : डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणीनंतर सोमवारी (ता. 19 मे) डॉक्टरांच्या पत्नी डॉ. उमा, मुलगा डॉ अश्विन आणि सून डॉ. शोनाली हे तिघे प्रथमच एकत्र आले होते. या तिघांचेही जबाब नोंदविण्यासाठी त्यांना न्यायालयात बोलविण्यात आले होते. मात्र, सोमवारी केवळ डॉ. उमा यांचा जबाब नोंदविण्यात आला. मात्र, डॉ अश्विन, डॉ शोनाली आणि इतर चौघे सहा जणांचे जबाब मंगळवारी (ता. 20 मे) घेण्यात आले.
जबाब देण्यासाठी काल डॉ. उमा, मुलगा डॉ अश्विन आणि सून डॉ. शोनाली हे तिघेही वेगवेगळ्या गाडीतून आले होते. न्यायालयाच्या (Court) परिसरात तिघेही सोमवारी दीड तासापेक्षा जास्त वेळ होते. मात्र, त्यांनी एकमेकांशी बोलणे सोडा, एकमेकांकडे पहिलेसुद्धा नाही, त्यामुळे वळसंगळकर कुटुंबीयातील गृहकलह सोमवारी कोर्टातही दिसून आला.
विख्यात मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांच्या आत्महत्येला 18 मे रोजी एक महिना झाला आहे. मात्र, पोलिसांनी आतापर्यंत केवळ मनीषा मुसळे माने हिचाच तपास केलेला आहे. डॉक्टरांचे निकटवर्तीय हे वळसंगकर यांच्या आत्महत्येमागे गृहकलह असल्याचे खासगी सांगत आहेत. या गृहकलहाचे कारण डॉ. शोनाली असल्याचेही ते सूचित करतात. मात्र, पोलिस त्या दिशेने तपास करायला तयार नाहीत.
साक्षीदार पुन्हा बदलू नयेत म्हणून भारतीय नागरिक सुरक्षा संहितेतील कलम 183 नुसार असे जबाब नोंदवून घेतले जातात. पोलिसांसमोर दिलेला जबाब हा कधी कधी दबावात येऊन दिला जाऊ शकतो. पण न्यायालयतील जबाब हा मोकळेपणाने दिला जातो, त्यामुळे पोलिसांसमोर दिलेले जबाब पुन्हा न्यायालयासमोर घेतले जातात. त्यानुसार डॉ शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांची पत्नी डॉ. उमा, मुलगा डॉ. अश्विन आणि सून डॉ. शोनाली यांचे काल जबाब देण्यासाठी आले होते. त्यातील डॉ. उमा वळसंगकर यांचा जबाब नोंदविण्यात आला होता.
डॉ. उमा वळसंगकर यांचा जबाब नोंदविण्यात आला होता. मात्र, डॉ. अश्विन आणि डॉ शोनाली या पती-पत्नीचा जबाब मंगळवारी नोंदविण्यात आला. हे तिघेही काल जवळपास दीड तास न्यायालयाच्या आवारात होते. मात्र, तिघांनी एकमेकांशी संवाद साधला नाही. पण एकमेकांकडे पाहिलेसुद्धा नाही. न्यायालयातून बाहेर पडताना डॉ. अश्विन आणि डॉ. उमा हे एकामागे एक हे त्यांच्या त्यांच्या गाडीतून निघून गेले. मात्र, डॉ. शोनाली ह्या काहीवेळ न्यायालयातच थांबून होत्या. थोड्या वेळेनंतर त्या तेथून चालत न्यायालयाबाहेर गेल्या आणि रस्त्यालगत लावलेल्या त्यांच्या चारचाकी गाडीतून निघून गेल्या.
दुसरीकडे, डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येनंतर सापडलेल्या सुसाईट नोटच्या आधारे हॉस्पिटलची प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने ही सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. डॉक्टरांच्या आत्महत्येच्या दुसरी दिवशी म्हणजे १९ एप्रिल रोजी मनीषा मुसळे माने हिला अटक करण्यात आली होती, तिला प्रथम पाच दिवसांची पोलिस कोठडी, त्यानंतर चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुन्हा दोन दिवसांची पोलिस कोठडी आणि त्यानंतर पुन्हा चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.
मनीषा मुसळे माने हिची न्यायालयीन कोठडी 27 मे रोजी संपणार असून तत्पूर्वीच पोलिसांनी डॉ. उमा, डॉ. अश्विन व डॉ. शोनाली यांचे जबाब न्यायालयासमोर घेण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय हॉस्पिटलमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचेही जबाब घेण्यास सुरुवात केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.