Kolhapur News : कोल्हापुरातील पंचगंगा नदीने सध्या धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे सर्वसामान्यांबरोबरच प्रशासनाने देखील पुराची धास्ती घेतली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने जिल्ह्यात महापुराची परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रविवारचा राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांचा कोल्हापूर जिल्ह्यातील दौरा महापुरामुळे रद्द झाल्याची माहिती समोर येत आहे.
कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील अनेक नद्या पात्राबाहेर गेल्याने अनेक जिल्हा मार्ग राज्य मार्ग पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे दळणवळणाची सुविधा कोलमडली असून जिल्ह्यात पावसाचा जोर अजूनही वाढत आहे. महापुराचे संकट कमी झाल्यानंतर त्यांचा दौरा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
वारणा उद्योगसमूहाच्या एका कार्यक्रमात राष्ट्रपती (President) द्रौपदी मूर्मू यांना आमदार विनय कोरे यांनी निमंत्रित केलं होतं. त्यानिमित्ताने राष्ट्रपती मूर्मू यांचा रविवारी (ता. 28) जिल्हा दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने अथक प्रयत्न घेऊन दौरा मार्ग, नियोजित ठिकाणापासून सर्वोतोपरी यंत्रणा सज्ज ठेवली होती.
कोल्हापूर विमानतळ ते श्री अंबाबाई दर्शन ते सर्किट हाऊस ते ताराराणी चौक ते तावडे हॉटेल ते वारणानगर कोडोली ते परत कोल्हापूर विमानतळ मार्ग निश्चित करण्यात आला होता. यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी वाहतूक नियमन निर्देश व आदेश जारी केले होते.
मात्र, कोल्हापुरात पावसाचा जोर कायम असल्याने पंचगंगा नदीसह वारणेला देखील महापूर आला आहे. काही रस्त्यावरील मार्ग पाण्याखाली गेल्याने आणि पावसाचा कायम असलेले परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. अशावेळी राष्ट्रपती महोदय यांच्या दौऱ्यात अडथळा येऊ नये, आणि खबरदारी म्हणून रविवारचा राष्ट्रपती महोदय यांचा दौरा रद्द करून तो पुढे ढकलण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.