INDIA Aaghadi News : लोकसभा निवडणुकीत 'चारशे पार'चा नारा सक्सेसफुल ठरला नसला तरी एनडीएला सोबत घेत मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर आले आहे. इंडिया आघाडीनेही या निवडणुकीत धडाकेबाज कामगिरी करताना भाजपला घाम फोडत 230 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे संसदेतील विरोधकांचा आवाज चांगलाच वाढला आहे. पण आता याच विरोधकांच्या इंडिया आघाडीची धाकधूक दोन पक्षांनी वाढवली आहे.
मोदी सरकारने (Modi Government) बोलावलेल्या नीती आयोगाची बैठक शनिवारी (ता.27 जुलै) होणार आहे. या बैठकीत विविध राज्यांचे मुख्यमंत्री, बडे नेते सहभागी होणार आहेत. तर,विरोधी पक्षांनी मात्र, या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. पण आता इंडिया आघाडीतील दोन पक्षांनी या बैठकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे इंडिया आघाडीतील दोन्ही नेते दिल्लीत होत असलेल्या नीती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
तर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी,पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान,कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या,हिमाचल प्रदेशचे सुखविंदर सिंग सुखु यांच्यासह अनेक मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत जाणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
विरोधकांच्या इंडिया आघाडीतील नेत्यांनी अर्थसंकल्पात राज्यांना सापत्न पणाची वागणूक दिल्याचा गंभीर आरोप करत केंद्रातील मोदी सरकारने बोलावलेल्या NITI आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याच्या निर्णय घेतला होता. मात्र, आता ममता बॅनर्जी आणि हेमंत सोरेन यांच्या निर्णयामुळे इंडिया आघाडीच्या एकजुटीला धक्का असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
नीती आयोगाच्या बैठकीतील उपस्थितीवरुन ममता बॅनर्जी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्या म्हणाल्या,केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहून मी माझे विचार मांडणार आहेत. जर त्यांनी माझ्या मतांकडे लक्ष दिले नाही तर तिथेच निषेध नोंदवणार आहे. याच बैठकीत बंगालमध्ये होत असलेल्या राजकीय भेदभावाचा मुद्दा मांडणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पश्चिम बंगालचे विभाजन करण्याची भाजप मंत्री आणि नेत्यांची वृत्ती असल्याचा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला. झारखंड,बिहार आणि बंगालचे विभाजन करण्यासाठी वेगवेगळे नेते वेगवेगळी विधाने करत आहेत अशी टीका त्यांनी केली.त्यांना आर्थिक नाकेबंदी लादण्याबरोबरच त्यांना भौगोलिक नाकेबंदीही करायची असल्याची टीका मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यावेळी केली.
केंद्र सरकारने आयोगाची नवीन टीम तयार केली आहे. या टीमचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील.सुमन बेरी यांना उपाध्यक्ष करण्यात आले आहे. NITI आयोगाच्या टीममध्ये पदसिद्ध सदस्य म्हणून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पदसिद्ध सदस्य करण्यात आले आहे.
तर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, अवजड उद्योग मंत्री एचडी कुमारस्वामी,आरोग्यमंत्री जेपी नड्डा. एमएसएमई मंत्री जीतन राम मांझी यांना विशेष निमंत्रित म्हणून स्थान देण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.