Dilip Mane-Siddheshwar Avtade-Baliram Sathe
Dilip Mane-Siddheshwar Avtade-Baliram Sathe sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

दूध पंढरीचा आखाडा : बळीराम साठे, दिलीप माने, आवताडेंची उमेदवारी ‘गॅस’वर!

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (जि. सोलापूर) : सोलापूर जिल्हा दूध संघाच्या (दूध पंढरी, Dudh Pandhari ) निवडणुकीत छाननीत माजी आमदार दिलीप माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) जिल्हाध्यक्ष बळीराम साठे (baliram Sathe) , संघाचे विद्यमान संचालक दीपक माळी, प्रभाकर कोरे, युवा नेते सिद्धेश्वर आवताडे या दिग्गजांसह तब्बल २६ जणांचे अर्ज बाद झाले होते. त्यातील १० जणांनी विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) पुणे यांच्याकडे अपिल केले होते, त्यावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे साठे, माने, आवताडे, कोरे यांच्यासह १० जणांच्या निवडणुकीतील भवितव्याचा फैसला येत्या १४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. (Dudh Pandhari Election: Decision of candidature of Baliram Sathe, Dilip Mane, Avtade on 14th February)

दरम्यान, जिल्हा दूध संघाच्या मतदार यादीतून मोहोळ तालुक्‍यातील 47 दूध संस्थांची नावे वगळण्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर उद्या (ता. ९ फेब्रुवारी) दुपारी अडीच वाजता उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

दूध पंढरीच्या राजकीय आखाड्यातून माने, साठे , माळी, कोरे, आवताडे या दिग्गजांसह तब्बल २६ जणांचे अर्ज छाननीत अवैध ठरले होते. त्या विरोधात साठे, माने, आवताडेंसह दहा जणांनी विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) पुणे यांच्याकडे अपिल केले हेाते. त्यामुळे उपनिबंधकांच्या निर्णयाकडे सोलापूर जिल्ह्याचे डोळे लागले आहेत

सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघांच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीसाठी क्रियाशील संस्था सभासद मतदारासंघासाठी 64 अर्जातील 21 अर्ज अवैध ठरले आहेत. एकूण 133 जणांपैकी 26 अर्ज अवैध ठरले आहेत. यामध्ये नारायण गुंड, अलका बंडगर, विकास गलांडे, हणमंत पोटरे, दीपक माळी, दाजी दोलतडे, सिद्धेश्वर आवताडे (दोन अर्ज), बळीराम साठे, संतोष वावरे, रेवती साखरे (दोन अर्ज), दिलीप माने (दोन अर्ज), प्रभाकर कोरे, ललिता लवटे, सरस्वती भोसले, कौशल्या नवले, संताजी पाटील, तायाप्पा गरंडे, संगीता लोंढे, पांडुरंग भाकरे, विजय गुंड, मीराबाई कसबे, भीमराव कोकरे, शहाजी पाटील यांचा यामध्ये समावेश आहे.

विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) पुणे विभाग यांच्याकडे अपिल करण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्यामध्ये तब्बल दहा उमेदवारांनी हरकत घेतली. यात दिलीप माने, बळीराम साठे, सिद्धेश्वर आवताडे, सरस्वती भोसले, तायाप्पा गरंडे, संताजी पाटील, दाजी दोलतोडे, दीपक माळी, संतोष वावरे, संगीता लोंढे यांचा समावेश असून, नामंजूर नामनिर्देशन पत्रासंबंधी एकूण दहा अपिल अर्जांवर सुनावणी झाली आहे.

दिलीप माने, सिद्धेश्वर आवताडे, बळीराम साठे यांच्या अपिल अर्जावर क्रियाशील व अक्रियाशील हा विषय सभासदांपुरता मर्यादित आहे. तो संचालकपदासाठी लागू होणार नाही, त्यामुळे सरकारने क्रियाशील व अक्रियाशील सभासदांबाबत ३१ मार्च २०२२ पर्यंत दिलेली सवलत संचालकपदाला लागू होणार नाही, असा युक्तिवाद ॲड. विनायक नागणे यांनी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) महेश कदम यांच्यासमोर मांडला. या अपिल अर्जानंतर नामनिर्देशन अर्ज मंजूर करायचे किंवा नाही, याचा निर्णय तारीख 14 फेब्रुवारीपर्यंत घेणे आवश्‍यक आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT