जयंत पाटलांच्या अजितदादा, वळसे पाटलांसह हसन मुश्रीफांना कानपिचक्या!

जिल्हा सहकरी बँकेत मंत्र्यांनी संचालक बनणे चुकीचे : जयंत पाटील
Jayant Patil-Ajit Pawar-Dilip Walse Patil-Hasan Mushrif
Jayant Patil-Ajit Pawar-Dilip Walse Patil-Hasan MushrifSarkarnama
Published on
Updated on

सांगली : राज्यातील काही जिल्ह्यांत मंत्री जिल्हा सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळामध्ये स्वःताची वर्णी लावून घेत आहेत. हे चुकीचे आहे. त्यांनी आपल्या विश्वास कार्यकर्त्यांना संधी देण्याची गरज आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी जिल्हा बॅंकेवर संचालक झालेल्या मंत्र्यांना कानपिचक्या दिल्या. (minister to become director in a district co-operative bank is wrong : Jayant Patil)

जयंत पाटील यांचा बोलण्याचा रोख नेमका कुणाकडे, अशी चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली होती. कारण, पुणे जिल्हा सहकारी बॅंकेवर खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar), गृहमंत्री दिलीप वळसे (dilip walse patil), राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharane), तर कोल्हापूर जिल्हा बॅंकेवर हसन मुश्रीफ (hasan mushrif) हे राष्ट्रवादीचे मंत्री संचालक आहेत. त्यामुळे जयंतरावांनी कोणावर निशाणा साधला, अशी चर्चा कार्यक्रमानंतर सुरू झाली आहे.

Jayant Patil-Ajit Pawar-Dilip Walse Patil-Hasan Mushrif
वाढलेले गट-गण दत्तात्रेय भरणेंना ताकद देणार की हर्षवर्धन पाटलांना साथ देणार?

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यालयात (स्व.) गुलाबराव पाटील पुरस्कारांचे वितरण जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी ही टोलेबाजी केली. या वेळी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम उपस्थित होते.

Jayant Patil-Ajit Pawar-Dilip Walse Patil-Hasan Mushrif
आमदार मोहितेंचा शिवसेना-भाजपला दणका; माजी उपनगराध्यांसह गोरे गटाचे कट्टर समर्थक राष्ट्रवादीत

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले की, ‘‘आमच्या पक्षाचे चिन्ह घड्याळ असले तरी माझे आणि घड्याळाचे कधीच जमले नाही. कार्यक्रमाला यायला मला नेहमीच उशीर होत असतो. धनुष्यबाण आणि हाताच्या नादाला लागून आता तर घड्याळ्याची वेळही चुकू लागली आहे. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस यांसारख्या संकटाला डाळिंब, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. पीक विमा कंपन्यांचे निकष आणि झालेले नुकसान यामध्ये मेळ बसत नाही, त्यामुळे बागायतदार मदतीपासून वंचित राहतात, त्यामुळे द्राक्ष उत्पादकांची अवस्था पाहून त्यांना कर्जवसुलीत सांगली जिल्हा बँकेने सवलत द्यावी. कर्जवसुलीत हप्ते पाडून मुदतवाढ द्यावी.’’  

Jayant Patil-Ajit Pawar-Dilip Walse Patil-Hasan Mushrif
आमच्यातील काही गद्दार शत्रूपक्षाला मिळाले : खेडमधील सत्तांतर आढळराव विसरेनात!

गुलाबराव पाटील यांनी नैतिकता, स्वच्छ चारित्र्य या बळावर नेहमी राजकारण, समाजकारण केले. लोक नेहमीच चांगले काम केलेल्या माणसाची दीर्घकाळ पूजा करतात. त्याप्रमाणेच गुलाबराव पाटील हे मनाने उमदे, निस्पृह होते. सहकारात त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांच्याबद्दल आजही राज्यभरात आदर आहे, असेही जयंत पाटील यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com