Eknath Shinde-Shambhuraj Desai-Makarand Patil-Jaykumar Gore Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli-Satara MLC : शिंदे-देसाई यांच्यात बंदखोलीत तासभर चर्चा; भाजपकडून डावलले जात असल्याने शिवसेना-राष्ट्रवादी नाराज

Shivsena-NCP Upset on BJP : सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील नाराजीच्या चर्चांना शंभूराज देसाई यांच्या विधानामुळे नवे बळ मिळाले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Satara, 13 June : सांगली-सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे; परंतु यामध्ये महायुतीत सर्वकाही आलबेल झाल्याचे अजूनही दिसून येत नाही. महायुतीचे घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना कुठेतरी नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. या चर्चेला अखेर आज (ता. १३ जून) पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या विधानानंतर बळ मिळाले आहे.

पालकमंत्री देसाई हे आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी दरे गावी आले होते. त्या वेळी या दोघांमध्ये जवळपास एक तास बंद खोलीत चर्चा झाली. या चर्चेनंतर पत्रकारांशी बोलत असताना मंत्री देसाई यांनी भाजपच्या सध्याच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कोणत्याही बैठकांना शिवसेनेला विचारात घेतले जात नसल्याचे त्यांनी बोलून दाखवले.

मंत्री देसाई म्हणाले, ‘‘सध्याच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमची अवस्था ‘येऊ नको, तर कोणत्या गाडीत बसू’, अशी झालेली आहे. आम्हाला जर कोणत्याही बैठकीचे निमंत्रणच नाही, तर आम्ही मग कोणत्या गाडीत बसायचे’’, असा खोचक सवालही त्यांनी केला.

आता याच पार्श्वभूमीवर आयोजित महायुतीच्या बैठकीला पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मदत व पुनवर्सन मंत्री मकरंद पाटील हे अनुपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

सातारा झेडपी निवडणुकीत मतभेद अन् मनभेद

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी साताऱ्यातील महायुतीत उभी फूट पडली होती. भाजपने सतत डावलले असल्याचे म्हणत राष्ट्रवादी आणि शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढवली होती. निकालानंतरही राष्ट्रवादी आणि शिवसेना युतीकडे स्पष्ट बहुमत होते.

भाजपकडे सर्वाधिक जागा होत्या. मात्र, बहुमताचा आकडा त्यांच्याकडे नव्हता. त्याचवेळी भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सदस्य फोडून जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली होती. या राड्यानंतर महायुतीतील नेत्यांमध्ये मतभेदांसह मनभेदही झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT