NCP News : पार्थ पवारांनी लक्ष घातलेल्या सर्वात मोठ्या संस्थेच्या चौकशीचे आदेश : राष्ट्रवादीच्या पुण्यातील बालेकिल्ल्यावर भाजपचा सर्जिकल स्ट्राईक

Katraj Dairy : कात्रज डेअरीच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत. अरुण चांभरे यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीनंतर अवघ्या 24 तासांत हा निर्णय झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
A high-level inquiry has been ordered into Katraj Dairy shortly after a leadership change, intensifying political discussions around Pune's cooperative sector.
A high-level inquiry has been ordered into Katraj Dairy shortly after a leadership change, intensifying political discussions around Pune's cooperative sector.Sarkarnama
Published on
Updated on

Katraj Dudh Sangh : पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात कात्रज डेअरीच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. भाजप नेते, राज्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी डेअरीच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. मागील अनेक वर्षांपासून पुण्यातील जिल्हा बँक, दूध संघावरती राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. आता याच डेअरीच्याच चौकशीचे आदेश निघाल्याने सहकारी आणि राजकीय वर्तुळातील जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दिवंगत अजित पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेते, खासदार पार्थ पवार यांनी या डेअरीची जबाबदारी घेतली आहे. काही दिवसांपूर्वीची त्यांनी दूध संघाची बैठक घेऊन त्यात स्वप्निल ढमढेरे यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा घेतला होता. त्यानंतर शुक्रवारी (12 जून) रोजी अरुण चांभारे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्यांच्या निवडीला 24 तास होण्यापूर्वीच चौकशीचे आदेश निघाले आहेत.

A high-level inquiry has been ordered into Katraj Dairy shortly after a leadership change, intensifying political discussions around Pune's cooperative sector.
NCP News : पुण्यातील सर्वात मोठ्या सहकारी संस्थेच्या अध्यक्षांचा राजीनामा : पार्थ पवारांच्या हाती दिले पत्र

हा अध्यक्षपदाचा तिढा सुटतोच कात्रज डेअरी व्यवस्थापनासमोर नवे संकट उभे ठाकले आहे. नारायणगाव (ता. जुन्नर) येथील वरुण जयसिंग भुजबळ यांनी २ जून २०२६ रोजी दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांच्याकडे कात्रज डेअरीच्या कारभाराविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत मंत्री सावे यांनी दुग्ध सचिवांना तात्काळ कारवाईच्या सूचना दिल्या.

मंत्री सावे यांच्या आदेशानंतर प्रशासकीय यंत्रणा वेगाने हलली असून, पुणे विभागीय दुग्ध उपनिबंधक राजकुमार पाटील यांनी ११ जून रोजी द्विसदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये अध्यक्ष श्रीकांत श्रीखंडे (सहायक दुग्ध निबंधक) आणि सदस्य अनंत चिंधु आढळारी (जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग-२ यांचा समावेश आहे. या समितीला संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

चौकशीचे मुख्य मुद्दे आणि तक्रारी

  • कात्रज दूध संघाअंतर्गत सर्व दूध संस्थांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी.

  • संबंधित संस्थांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन भौतिक पडताळणी करण्यात यावी.

  • दूध संकलन केंद्र, दूध उत्पादक शेतकरी, सभासद, दूध वाहतूक व व्यवहारांची प्रत्यक्ष तपासणी करण्यात यावी.

  • संबंधित संस्थांची बँक खाती, दूधबिले, संगणकीय नोंदी व आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी.

  • प्रत्यक्ष अस्तित्वात नसलेल्या, जागेवर दूध संकलन न करणाऱ्या व केवळ कागदोपत्री चालविण्यात येणाऱ्या बनावट संस्थांची नोंदणी रद्द करण्यात यावी.

A high-level inquiry has been ordered into Katraj Dairy shortly after a leadership change, intensifying political discussions around Pune's cooperative sector.
NCP Setback : राष्ट्रवादीला डबल झटका; एकाच वेळी नगराध्यक्षासह सभापतींचे जात प्रमाणपत्र ठरवले अवैध

चौकशीला पूर्ण सहकार्य करणार :

या चौकशासाठी पूर्ण सहकार्य केले जाईल, आवश्यक असणारी कागदपत्रे उपलब्ध करुन दिली जातील. मात्र, या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी संचालक मंडळाने नेहमीच प्राधान्य दिले आहे, अशी भूमिका कात्रज दूध डेअरीच्या संचालक मंडळाने मांडली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com