

Supriya Sule: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या काँग्रेसमध्ये विलीनकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. काँग्रेसकडून याला दुजोरा देण्यात आला आहे, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी याचा इन्कार केला आहे. पण आता या पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी यावर महत्वाचं भाष्य केलं आहे.
शनिवारी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी विविध विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी काँग्रेसमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस विलीन करण्याच्या हालचाली किंवा चर्चा सुरु आहेत यावर प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना सुळे म्हणाल्या, "मला याबद्दल काही माहिती नाही. तुमच्याकडून मला या चर्चेबाबत कळलं आहे. मला आणि पवार साहेबांना याबद्दल काही माहिती नाही"
म्हणजेच सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या काँग्रेसमध्ये विलिनकरणाच्या चर्चांवर आता पडदा टाकला आहे. पण तरीही काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कालच याबाबत आमच्याकडं पूर्वीच प्रस्ताव आल्याचं सांगितलं होतं. त्यामुळं नेमकं खरंतर कोण बोलतंय? किंवा या चर्चा का घडवून आणल्या जात आहेत? याबाबत अद्यापही संभ्रम आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालमधील सत्ता गमावल्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांची त्यांच्या पक्षाच्या २० खासदार आणि ६० आमदारांनी साथ सोडली आहे. संसद आणि विधानसभा अशा दोन्हीकडील सदस्यांनी दोन तृतीयांश संस्थेनं आपापला वेगळा गट स्थापन केल्यानं त्यांनी अपात्रतेची कारवाईपासून आपला बचाव केला आहे. तसंच २० खासदारांनी भाजपप्रणित एनडीएसोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
तर राज्यातील बंडखोर आमदारांच्या गटानं आपला नेता ऋतब्रत बॅनर्जी यांना विरोधीपक्ष नेता म्हणून मान्यता दिली असून विधानसभा अध्यक्षांनी त्यांची नियुक्ती केली आहे. अशा प्रकारे ममता बॅनर्जींकडं आता पुढे राजकारण करण्याइतकं संख्याबळ शिल्लक राहिलं नसल्यानं त्या आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. या चर्चेदरम्यान राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचीही चर्चा सुरु आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.