Raj-Uddhav Thackeray-Eknath shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maharashtra Politic's : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत एकनाथ शिंदेंचे मोठे विधान; राज अन्‌ उद्धव ठाकरेंना का दिल्या शुभेच्छा!

Raj-Uddhav Thackeray-Eknath shinde : दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावेत, यासाठी शिवसेनेचे नेते विठ्ठलला साकडे घालत आहे. त्यावर शिंदे म्हणाले, आता आमचे गिरीश महाजन चार दिवस पंढरपुरात ठाण मांडून थांबणार आहेत. पण

Vijaykumar Dudhale

Solapur, 03 July : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत राज्यभरात जोरदार चर्चा रंगली आहे. येत्या शनिवारी हे दोन्ही ठाकरे बंधू विजयी मेळाव्याच्या निमित्ताने अनेक वर्षांनतर प्रथमच एकत्र येत आहेत. त्याबाबत उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मोठे भाष्य केले आहे. ‘लोकशाहीत कोणी कोणासोबत युती करू शकतो, जे जे काही होते आहे, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत’ असेही शिंदेंनी स्पष्ट केले.

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज (ता. ०३ जुलै) पंढरपूरला भेट देऊन वारीसंदर्भातील सोयी-सुविधांचा आढावा घेतला. त्यांनी पंढरपूर शहरातून बुलेटवरून फेरफटका मारत शहराची, दर्शन रांग, भक्ती सागर (६५ एकर), मंदिर परिसरात वारकऱ्यांना देण्यात येत असलेल्या सुविधांची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी दोन्ही ठाकरेंना एकत्र येण्याबाबत शुभेच्छा दिल्या.

दोन्ही ठाकरे बंधू (Thackeray Brother) एकत्र यावेत, यासाठी शिवसेनेचे नेते विठ्ठलला साकडे घालत आहे. त्यावर शिंदे म्हणाले, आता आमचे गिरीश महाजन चार दिवस पंढरपुरात ठाण मांडून थांबणार आहेत. पण ते राजकारणासाठी नाही तर पंढरपुरातील वारीच्या नियोजनासाठी थांबणार आहेत. गेल्या वर्षीही ते ठाम मांडून होते.

दिशा सालियान प्रकरण कोर्टात आहे, त्यामुळे त्यावर बोलता येत नाही. कॉरिडॉरबद्दल निवेदन घेऊन लोक भेटले. स्थानिक लोकांचे नुकसान न करता योग्य मार्ग काढू, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

पंढरपुरात मी मंत्री म्हणून नाही, वारकरी म्हणून आलो आहे. शौचालय वाढ केली आहे, स्नानगृहे केली आहेत. लहान लहान गोष्टींवर लक्ष दिले. वारकऱ्यांची वारी सुरक्षित व्हावी. कुठे काही घटना घडली तर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पोलिस अलर्ट आहेत, असेही शिंदेंनी स्पष्ट केले.

मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धनाचे काम सुरू असून, झालेल्या कामांची पाहणी केली. तसेच, मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मंदिर जतन व संवर्धन कामाबाबतची माहिती दिली.

पाहणी दौरा आणि विठ्ठल दर्शनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, लाखो वारकऱ्यांचे पंढरपुरात स्वागत करतो. गतवर्षी सूचना दिल्या, त्या पद्धतीने नियोजन झाले की नाही, याची पाहणी केली आहे. पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी येतात. वारकरी सुखरुप परत जावेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मी पण पंढरपूरमध्ये नियम पाळले, ‘नो व्हेईकल झोन’ पाळला. फक्त मुखदर्शन घेतले. व्हीआयपी रांगेतून दर्शन घेतले नाही. कारण, सगळ्यात मोठा व्हीआयपी वारकरी आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT