
Solapur, 03 July : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (ता. 03 जुलै) पंढरपूरला भेट देऊन वारीसंदर्भातील सोयी-सुविधांचा आढावा घेतला. पंढरपूर शहरातून बुलेटवरून फेरफटका मारत शहर, दर्शन रांग, भक्ती सागर (65 एकर), मंदिर परिसरात वारकऱ्यांना देण्यात येत असलेल्या सुविधांची शिंदेंनी पाहणी केली. शिंदेंच्या बुलेटस्वारीचे भाजप आमदार एकनाथ शिंदे यांनी सारथ्य केले. मात्र, एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाच्या गाभाऱ्यात न जाता मुखदर्शन घेतल्याने त्याची चर्चा रंगली आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री झाल्यापासून आषाढी वारीच्या सोयी सुविधांची पाहणी करण्यासाठी दोन दिवस अगोदर येतात, त्यानुसार शिंदेंनी आज पंढरपूर शहरात फेरफटका मारत सोयी-सुविधांची पाहणी केली. एकनाथ शिंदे यांच्यासमवेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार समाधान आवताडे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिकासिंह ठाकुर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुचाकीवरून पंढरपूर (Pandharpur) शहर, दर्शन रांग, चंद्रभागा वाळवंटाची पाहणी केली. भाजपचे पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांनी शिंदे यांच्या बुलेट वारीचे सारथ्य केले. आवताडे यांच्यासमवेत शिंदेंनी चंद्रभागा वाळवंटाची पाहणी केली. चंद्रभागा नदीपात्रामध्ये काही प्रमाणात अजूनही पाणी आहे, त्यामुळे शिंदे यांनी उजनी धरणातून सोडण्यात येणारे पाणी बंद करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
आपत्कालीन दक्षता आणि प्रतिसाद केंद्राला भेट देऊन तेथे आयसीयूमध्ये असलेल्या रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पोलिस विभागाने वारी कालावधीत गर्दी आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नव्याने खरेदी केलेल्या ड्रोनची पाहणी करून उद्घाटन केले. पत्राशेड येथे असलेल्या दर्शन रांगेची पाहणीही त्यांनी केली. तसेच, दर्शन रांगेतील भाविकांशी संवाद साधून दर्शन रांगेतील सुविधा विषयी माहिती घेतली.
पंढरपुरातील पाहणी दौऱ्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मुख दर्शन घेतले. आषाढी यात्रा सोहळ्यासाठी राज्यभरातून वारकरी मोठ्या प्रमाणात पंढरीत दाखल झाले आहेत. वारकऱ्यांच्या दर्शन रांगेत अडथळे येऊ नयेत, यासाठी एकनाथ शिंदे यांनी मुखदर्शन घेतले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनीही मुखदर्शन घेतले.
एकनाथ शिंदे यांनी गाभाऱ्यात न जाता मुखदर्शन घेतले, त्याची जोरदार चर्चा पंढरपुरात रंगली आहे. तसेच, भाजप आमदार समाधान आवताडे यांनी केलेल्या सारथ्याचीही चर्चा होत आहे. त्यांनी व्हीआयपी रांगेतून दर्शन न घेता सर्वसाधारण जनतेप्रमाणे मुखदर्शन घेतले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.