Eknath Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Eknath Shinde : बालेकिल्ल्यात कमी पण लाडक्या कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांचे सतत दौरे; शिवसैनिकांमध्ये उर्जा...

Rahul Gadkar

Kolhapur Lok Sabha Constituency : कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अत्यंत चुरशीची आणि अटीतटीची बनत चालली आहे. सुरुवातीला महायुतीत या दोन पैकी एका जागेवर भाजपने दावा केल्यानंतर या दोन्ही जागा शिंदे गटाकडे घेण्याचे मोठे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांच्यापुढे होते. मात्र, भाजपच्या दबावाला बळी न पडता शिंदे गटाने दोन्हीही जागा आपल्याकडे मिळवण्यात यश मिळवले.

शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर जनतेत असणारी नाराजी, उमेदवारांचा कमी जनसंपर्क यामुळे दोन्हीही जागा अडचणीत असल्याचे सांगितले जात होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीपासूनच हार न मानायचे ठरवल्याने सातत्याने ठाण्यापेक्षा कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा (Hatkanangale Loksabha Election) मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे सातत्याने त्यांचे दौरे झाल्याने शिवसैनिक ही चार्ज झाले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेल्या पंधरा दिवसापासून तापत असलेल्या कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रंगत उद्या थांबणार आहे. आरोप प्रत्यारोपांचा खेळ सध्या चालू असला तरी प्रत्येक उमेदवार आणि उमेदवाराचा वरिष्ठ नेता ही कुस्ती मारण्यासाठी शड्डू ठोकून मैदानात उतरला आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Shivsena) ही मागे राहिले नाहीत. उद्या लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) प्रचाराची रविवारी संगता होत असून, दिवसभर पदयात्रा, रॅली आणि सभांचा नुसता धडाका आहे. गेल्या पंधरा दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चार वेळा कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. प्रत्येक वेळी किमान दोन दिवस त्यांनी कोल्हापुरात मुक्काम ठोकला होता. अशातच आज सकाळी ते पुन्हा कोल्हापूर (Kolhapur) दौऱ्यावर येणार असून तीन दिवस त्यांचा कोल्हापुरात ठिय्या असणार आहे.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सकाळी 11 वाजता गारगोटी, 3 वाजता वाठार येथे अशोकराव माने संस्था, साडेचार दत्तमंदिर नरसिंहवाडी, पावणे पाच शिरोळ, पाच वाजता जयसिंगपूर जाहीर सभा, साडेसहा वाजता सांगली फाटा शिरोली अखिल भारतीय जैन संघ भेट, साडेसात वाजता - खर्डेकर चौक, कागल येथे सभा घेणार आहेत.

कोल्हापुरात संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) है रॅलीत सहभागी होणार आहेत. हातकणंगले मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने है दुपारी तीन वाजता इलकरंजी येथील शिवतीर्थ येथून घोरपड़े नाट्यगृहापर्यंत रॅली काढणार आहेत. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार आहेत. उद्या (रविवारी) संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ सकाळी नऊ वाजता मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत राधानगरी व त्यानंतर सकाळी अकरा वाजता कोल्हापूर शहरातून रॅली काढण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT