Mangesh Chivte Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maharashtra Politic's : शिंदेंनी चिवटेंचं मन राखलंच; 2 मंत्री, 1 खासदार, 6 आजी-माजी आमदार अन्‌ डझनभर नेत्यांच्या उपस्थितीत ‘पुणे शिक्षक’मध्ये उमेदवार उतरवलाच, भाजपला कडव्या संघर्षाचा इशारा

Shivsena Vs BJP : पुणे शिक्षक मतदारसंघासाठी भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिल्यानंतर शिवसेनेने मंगेश चिवटे यांचा अर्ज दाखल करत शक्तिप्रदर्शन केले. त्यामुळे महायुतीतील जागावाटपावरून मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Vijaykumar Dudhale

Pune, 06 October : पुणे शिक्षक मतदार संघावरून महायुतीमध्ये उभी फूट पडल्याचे दिसून येत आहे. भारतीय जनता पक्षाने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतरही शिवसेनेने शिक्षक मतदारसंघावरील आपला दावा सोडला नसल्याचे मंगेश चिवटे यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावेळच्या शक्तिप्रदर्शनातून स्पष्ट होते. चिवटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 2 मंत्री, 1 खासदार, 6 आजी-माजी आमदार अन्‌ डझनभर नेत्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवून भाजपला योग्य तो संदेश दिल्याचे मानले जात आहे.

पुणे पदवीधर आणि शिक्षक हे दोन्ही मतदारसंघ भारतीय जनता पक्षाने स्वतःकडे ठेवले आहेत. वास्तविक मागील निवडणुकीत भाजप एकाही जागेवर विजयी झालेला नव्हता. पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड हे भाजपचे संग्राम देशमुख यांना हरवून विजयी झाले होते. शिक्षक मतदासंघातून काँग्रेसचे कोल्हापवूर जयंत आसगांवकर हे निवडून आलेल आहेत. त्यामुळे मित्रपक्षांकडून विशेषतः शिवसेनेकडून दबावचे राजकारण केले जात आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेनेचे मंगेश चिवटे यांनी गेल्या काही महिन्यांपासून निवडणुकीची तयारी चालवली होती. त्यांच्यासाठी शिवसेनेने मतदारसंघावर दावा केला होता. मात्र, भाजपने दोन्ही जागा आपल्याकडे खेचून आणून उमेदवार जाहीर केले आहेत. शिक्षक मतदारसंघातून भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

भारतीय जनता पक्षाने कौस्तुभ गावडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शिवसेनेनेसुद्धा आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेशिवाय चिवटे एवढ धाडस करण्याची शक्यता कमीच आहे. मंगेश चिवटे यांचे मन राखण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दोन मंत्री, खासदार आणि अन्य बड्या नेत्यांना उमेदवारी अर्ज भरायला पाठविले होते.

मंगेश चिवटे यांनी शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वतः उद्योगमंत्री उदय सामंत, आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर, खासदार ज्योती वाघमारे यांनी रॅलीत हजेरी लावली, त्यामुळे पुण्यात महायुतीतच संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महायुतीमध्ये राहून एकनाथ शिंदे यांनी भाजपशी दोन हात करण्याचा निर्णय घेतल्याचे पुण्यातील निर्णयावरून दिसून येते. 2 मंत्री, 1 खासदार, 6 आजी-माजी आमदार अन्‌ डझनभर नेत्यांना पाठवून एकनाथ शिंदे यांनी भाजपला जो काही संदेश द्यायचा आहे, तो दिला आहे. त्यामुळे पुणे शिक्षक मतदारसंघातून भाजपशी दोन हात करण्याची तयारी एकनाथ शिंदे यांनी चालवल्याचे दिसून येत आहे.

SCROLL FOR NEXT