Satara Politic's : जयकुमार गोरेंच्या कट्टर विरोधकाची शेखर गोरेंनी घेतली भेट; बंद दाराआडच्या चर्चेने साताऱ्यात खळबळ...

Satara Dcc Bank Election 2026 : सातारा डीसीसी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेखर गोरे यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. जयकुमार गोरे यांच्याशी असलेल्या राजकीय संबंधांच्या पार्श्वभूमीवर भेट चर्चेत आहे.
Ramraje Naik Nimbalkar-Shekhar Gore
Ramraje Naik Nimbalkar-Shekhar GoreSarkarnama
Published on: 
Updated on: 

Satara, 06 October : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीला आता मोठी रंगत येऊ लागली आहे. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर पुन्हा एका जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत केंद्रस्थानी येताना दिसत आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू आणि शिवसेनेत प्रवेश केलेले शेखर गोरे यांनी सोमवारी रामराजेंची एका हॉटेलमध्ये भेट घेतली. त्यामुळे चर्चेला उधाण आहे. कारण जयकुमार गोरे आणि रामराजे यांच्यातून विस्तवही जात नसताना त्यांच्या भावाने घेतलेली ही भेट विशेष मानली जात आहे.

सातारा जिल्हा बॅंकेची निवडणूक सध्या निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी उदयनराजे भोसले यांच्याविरोधात निवडणूक लढविणारे ज्ञानेश्वर पवार यांनी माघार घेतल्याने खासदार भोसले यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

तत्पूर्वी सोमवारी राजकीय गाठीभेटीने सातारा जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील एका खासगी हॉटेलमध्ये आलेले रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भेटीसाठी कट्टर राजकीय विरोधक जयकुमार गोरेंचे बंधू शेखर गोरे पोचले, ही बातमी संपूर्ण जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली. या दोघांची बंद दाराआड सुमारे तास ते दीड तास चर्चा झाली आहे, त्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

शेखर गोरे यांच्या भेटीच्या वेळी माजी आमदार प्रभाकर घार्गे आणि सुरेंद्र गुंदेचा हेही उपस्थित होते. शेखर गोरे यांनी सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी तीन मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यात माण सहकारी सोसायटी, मजूर सहकारी सोसायटी आणि ओबीसी प्रवर्ग या मतदारसंघांतून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे, त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपावर तोडगा निघतो की तीनही पक्ष स्वतंत्र लढतात, यावर शेखर गोरेंचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

Ramraje Naik Nimbalkar-Shekhar Gore
Satara DCC Bank Election : सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत मोठी घडामोड : उदयनराजे भोसलेंनी दुसऱ्यांदा बिनविरोध मारली बाजी

दरम्यान, शेखर गोरे यांच्याबरोबरच रामराजे नाईक निंबाळकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार नितीन पाटील, कराडमधील नेते ॲड उदयसिंह पाटील उंडाळकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे, बॅंकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, प्रदीप विधाते, सुरेंद्र गुंदगे या मातब्बरांनी दिवसभरात रामराजेंची भेट घेऊन त्यांच्याशी जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा केली. मात्र, शेखर गोरे आणि रामराजेंच्या भेटीची चर्चा होताना दिसत आहे.

Ramraje Naik Nimbalkar-Shekhar Gore
Shiv Sena News: शिवसेना नेत्याच्या मुलाची हत्या; आजोबांनीच केला 'गेम', तपासात उलगडली मर्डर मिस्ट्री

रामराजे नाईक निंबाळकर आणि शेखर गोरे हे दोघेही सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत एकत्र आहेत. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेतील या दोन नेत्यांमध्ये काय खलबतं झाली, याची जिल्ह्याला उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com