Satara DCC Bank Election : सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत मोठी घडामोड : उदयनराजे भोसलेंनी दुसऱ्यांदा बिनविरोध मारली बाजी

Udayanraje Bhosale elected unopposed : सातारा जिल्हा बँक निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. त्यांच्या विरोधातील उमेदवार ज्ञानेश्वर पवार यांनी अर्ज मागे घेतल्याने निवडीची औपचारिकता बाकी आहे.
Udayanraje Bhosale
Udayanraje BhosaleSarkarnama
Published on: 
Updated on: 

Satara, 06 October : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत मोठी घडामोड समोर आली आहे. संचालक मंडळाच्या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे. खासदार भोसले यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरलेले ज्ञानेश्वर पवार यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे, त्यामुळे उदयनराजेंची बिनविरोध निवड निश्चित झाली असून त्यांच्या निवडीची औपचारिकता बाकी आहे.

दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले हे दुसऱ्यांदा सातारा जिल्हा बॅंकेवर निवडून आले आहेत. या दोन्ही वेळा त्यांनी गृहनिर्माण व दुग्ध संस्था मतदारसंघातून बिनविरोध बाजी मारली आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांनी गृहनिर्माण व दुग्ध संस्था मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांच्या विरोधात ज्ञानेश्वर पवार यांनी उमेदवारी दाखल केली होती.

उमेदवारी अर्ज माघारीच्या घेण्याच्या पहिल्याच दिवशी ज्ञानेश्वर पवार यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. छत्रपतींच्या गादीचा सन्मान म्हणून आपण अर्ज मागे घेतल्याची प्रतिक्रिया ज्ञानेश्वर पवार यांनी दिली आहे.

Udayanraje Bhosale
Gokul Election : गोकुळच्या एका जागेवरून शिवसेना-राष्ट्रवादीत घामासान : यड्रावकर गटाचा महायुतीत फुटबॉल

पवार यांच्या माघारीच्या भूमिकेमुळे खासदार उदयनराजे भोसले यांची जिल्हा बॅंकेवर बिनविरोध निवड झाल्यात जमा आहे. आता फक्त यांच्या औपचारिक निवडीची घोषणा बाकी आहे. खासदार भोसले हे जिल्हा बॅंकेवर दुसऱ्यांदा बिनविरोध निवडून आले आहेत.

Udayanraje Bhosale
PDCC Bank Election : अशोक पवार की नवा चेहरा? १३१ ठराव, ४६ मातब्बर अन् एकच खुर्ची; शिरूरचा ‘बँकिंग बॉस’ कोण?

सातारा जिल्हा बँकेच्या २०२१ च्या निवडणुकीत उदयनराजे भोसले यांनी गृहनिर्माण व दुग्ध विकास संस्था गटातून उमेदवारी अर्ज भरला होता. त्या वेळी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या विरोधातील इतर उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने त्यांची पहिल्यांदा बॅंकेवर बिनविरोध निवड झाली होती.

दरम्यान, या वेळी पहिल्याच दिवशी त्यांच्या विरोधात अर्ज भरलेले ज्ञानेश्वर पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे, त्यामुळे उदयनराजे भोसले यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com