Abdul Sattar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Eknath Shinde's 'B Plan' : एकनाथ शिंदेंकडे ‘बी प्लॅन’ तयार आणि तो कधीही फेल जात नाही; अब्दुल सत्तारांचे पंढरपुरात विधान

सरकारनामा ब्यूरो

Pandharpur : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केवळ ‘ए प्लॅन’ लोकांना दिसतो. पण, त्यांचा ‘बी प्लॅन’ कधीच दिसत नाही. महत्वाचे म्हणजे एकनाथ शिंदे यांचा ‘बी प्लॅन’ कधीही फेल होत नाही. सध्या त्यांचा ‘बी प्लॅन’ तयार आहे, असे सूचक विधान राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी पंढरपुरात बोलताना केले. (Eknath Shinde has 'Plan B' prepared and it never fails : Abdul Sattar)

पणनमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे आज पंढरपूरच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सर्वच राजकीय पक्ष आपला माणूस पडणार नाही, यासाठी प्लॅन तयार ठेवतात. माझा एकही आमदार पडू देणार नाही, अशी घोषणा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभेत केली आहे. जेव्हा नेता अशी घोषणा करतो, तेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याने शंभर टक्के विश्वास ठेवला पाहिजे.

राजकारण, समाजकारण आणि तत्कालीन परिस्थिती, तसेच पुढील १३ महिन्यांत काय परिस्थिती होईल, कशी कशी स्थिती निर्माण होईल, हे आज बोलणं योग्य नाही. पण, मुख्यमंत्री शिंदे यांच्या कामावर जनता खूश आहे. आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत. त्याचा फायदा आम्हाला होईल. काही कमी असेल तर त्यात सुधारणा करून पांडुरंगाच्या चरणी ५० आमदारांचे ७५ आमदार कसे हेातील, यासाठी प्रार्थना करून काम करण्यात येईल, असेही सत्तार यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे घेतील. सत्ताधारी पक्षाकडे २०० पेक्षा जास्त आमदार आहे. मंत्रिपदे फक्त १३ आहेत, त्यामुळे सर्वांना खूश करणे तर शक्य नाही. त्यामुळे मंत्री करण्याची निर्णय वरिष्ठ नेते घेतली. हे सर्व नेते योग्य त्या माणसाला न्याय देतील, अशी अपेक्षा आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीआधी आमच्या सिल्लोड नगर परिषदेची निवडणूक आहे. सिल्लोडमध्ये एक लाख मतं आहेत, त्याच ठिकाणी माझा अर्धा पिक्चर क्लिअर होऊन जातो. शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही पुन्हा येऊ. तसेच, शिवसेनेच्या आमच्या ५० लोकांमध्ये कोणताही वाद नाही, असा दावाही अब्दुल सत्तार यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT