Kolhapur News: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. आज शिवसेनेकडून कोल्हापुरात गटप्रमुखांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसैनिकांना साद घातली.
कोल्हापुरातील रामकृष्ण मल्टीपर्पज हॉल येथे हजारो शिवसैनिकांच्या उपस्थित हा मेळावा पार पडला.निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे, सुपारी फुटली आहे. 2 डिसेंबरला निवडणूक आहे, 3 ला निकाल आहे. हा एकनाथ शिंदे गुलाल उधळायला येईल,असंही त्यांनी म्हटलं.
विधानसभेला विरोधकांचा गाडा सिंगल पलटी झाला आहे. आता सगळं पलटी करायचं. आता सुट्टी द्यायची नाही. आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका नगरपंचायत मध्ये विरोधकांचा सुपडा साफ करून एकदम विषय हार्ड करून टाका, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
जिवाला जीव देणार हा शिवसैनिक आहे. हा शिवसैनिक हा पक्षाचा श्वास आहे. शिवसैनिक हाच सेनेचा ऐश्वर्य आहे. येणारी प्रत्येक निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकवायचं आहे. असे शिवसैनिकांना आवाहन करत एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर शिवसेनेचा (Shivsena) बालेकिल्ला आहे, यंदा 100 टक्के निकाल दिला आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अशाच पद्धतीने आशीर्वाद द्या, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
हे महायुतीचं सरकार आहे. केवळ घोषणा करत नाही. यापूर्वी अनेकांनी घोषणा केल्या. मात्र शेतकऱ्यांना काय मिळालं याचा शोध सुरू आहे. 30 जून च्या आधी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय घेणार आहोत. आम्ही एकदा शब्द दिला की दिला, ही काळया दगडावरील भगवी रेष आहे.
ही शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधल्याने लोकांनी त्यांना धडा शिकवला. विरोधकांचा मत चोरीचा आरोप सुरू आहे. आता मतपेटीतूनच त्यांना उत्तर द्या. मतदार यादी ही पारदर्शक असली पाहिजे. ही आमची देखील बाजू आहे. मात्र विरोधकांनी मतचोरी मतचोरी करत देशाची अनेक वर्ष नोटचोरी केली. असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला.
शिवसेनेचा कोणी मालक नाही, तुम्ही आपण सर्व कार्यकर्ते आहोत. जिथे संकट त्याच्या शिवसेना, जिथे संकट तिथे एकनाथ शिंदे धावून जातो. येणाऱ्या जिल्हा परिषद नगरपालिका महापालिका निवडणुकीत भगवा फडकवा. गाव तिथे शिवसेना गाव तिथे शिवसेनेची संकल्पना राबवा. विरोधकांची चारी मुंड्या चीत करूया, असेही शिंदे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.