Chief Minister Eknath Shinde meets former MLA Sadashivrao Sapkal during Satara tour, marking a significant reunion with Shiv Sena’s early leadership roots in western Maharashtra. 
पश्चिम महाराष्ट्र

Shivsena News : पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेचा 'पहिला आमदार' ठाकरेंची साथ सोडणार? एकनाथ शिंदेंचा सातारा दौरा फत्ते

Shivsena News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा दौऱ्यात माजी आमदार सदाशिवराव सपकाळ यांची भेट घेतली. पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेचे पहिले आमदार असलेल्या सपकाळ यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चा रंगल्या आहेत.

Hrishikesh Nalagune

Eknath Shinde Meets Sadashivrao Sapkal : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा दौऱ्यात बऱ्याच महत्वाच्या भेटीगाठी घेतल्या. यात त्यांची सर्वात महत्त्वाची आणि सर्वांच्या भुवया उंचावणारी भेट झाली ती म्हणजे माजी आमदार सदाशिवराव सपकाळ यांच्यासोबत. सदाशिवराव सपकाळ हे जावली मतदारसंघातून 1995 मध्ये निवडून आले होते. ते सातारा जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेचे पहिले आमदार आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच सातारा जिल्ह्यात मेळावा घेतला, तसेच महाविकास आघाडीमधील काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षांमधील स्थानिक नेत्यांच्या भेटी घेतल्या. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनी सातारा जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे यांच्यासमवेत भेट घेतली.

या भेटीनंतर सपकाळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, सपकाळ यांच्या मुलाचे नोव्हेंबर महिन्यात लग्न असून, त्याची निमंत्रण पत्रिका देण्याच्या निमित्ताने त्यांनी भेट घेतल्याचे बोलले जात आहे. सपकाळ आणि शिंदे यांचे चांगले आणि जवळचे संबंध आहेत. यापूर्वीही सपकाळ यांच्या एकसष्ठीच्या कार्यक्रमालाही हजेरी लावली होती.

सदाशिवराव सपकाळ जुने शिवसैनिक :

1983-84 पासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सातारा जिल्ह्यात आपला संपर्क वाढविला होता. काही निवडक कार्यकर्त्यांना घेऊन त्यांनी सातारा जिल्ह्यात शाखा सुरू करण्यास सुरुवात केली. त्यानंतर शिवसेनेत कार्यकर्ते व पदाधिकारी वाढू लागले. याच दरम्यान, माथाडी कामगार असलेले सदाशिवराव सपकाळही मुंबईहून जावलीला गेले आणि शिवसेना पक्ष, संघटना वाढविण्यावर भर दिला.

1990 च्या विधानसभा निवडणुकीपासून शिवसेनेने राज्यभर उमेदवार देण्यास सुरवात केली. त्यावेळी सपकाळ यानी बाळासाहेब ठाकरेंकडे उमेदवारी मागितली. त्यांचे संघटनेचे काम आणि तळमळ बघून बाळासाहेबांनी अनेक दिग्गज नेते मंडळींना डावलून सपकाळ यांना तिकीट दिले. "ज्यांनी माझी संघटना उभी केली, त्याला माझे पहिले प्राधान्य राहिल, असे सांगत सपकाळ यांना उमेदवारी जाहीर झाली.

त्या निवडणुकीत सपकाळ यांना यश आले नाही. पण 1995 ला ही बाळासाहेबांनी आपला तोच शब्द कायम ठेवला. "माथाडी कामगाराच्या मुलालाच मी दुसऱ्यांदा तिकिट देणार" असे त्यांनी सांगितले. सपकाळ यांना दुसऱ्यांदा तिकिट मिळाले आणि ते विजयी झाले. साताऱ्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील ते शिवसेनेचे पहिले आमदार झालो. 1999 मध्ये मात्र शशिकांत शिंदेंकडून सपकाळ यांचा पराभव झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT