Ajit Pawar,Eknath Shinde & Devendra Fadanvis Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Eknath Shinde: कोल्हापुरात महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटला, CM शिंदेंच्या भाषणातील 'या' आहेत 10 गेमचेंजर घोषणा

Mahayuti Kolhapur Prachar Sabha : महायुतीने कोल्हापुरातून मंगळवारी (ता.5) प्रचाराचा नारळ फोडला.आपल्या पहिल्याच सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर आरोप केला.उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेते हे खोटं बोलतात.यासोबतच्या शिंदेंनी महायुतीच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाच्या घोषणांची माहिती दिली आहे.

Deepak Kulkarni

Kolhapur News : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार आता जोर धरू लागला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीसह सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी जोर लावला आहे. आता महायुतीने कोल्हापुरातून निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला.

आपल्या पहिल्याच सभेत मुख्यमंत्री.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 10 मोठ्या घोषणा केल्या आहेत.

महायुतीने (Mahayuti) कोल्हापुरातून मंगळवारी (ता.5) प्रचाराचा नारळ फोडला. आपल्या पहिल्याच सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर आरोप केला. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेते हे खोटं बोलतात. यासोबतच्या शिंदेंनी महायुतीच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाच्या घोषणांची माहिती दिली आहे.

आम्ही पुन्हा एकदा 23 तारखेला विजयाचा गुलाल उधळायला इथं येणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. याचवेळी त्यांनी लाडक्या बहि‍णींना पंधराशेवरुन 2100 रुपये दरमहा मिळणार असल्याची मोठी घोषणाही केली.

तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महायुतीच्या संयुक्तिक अशा पहिल्याच प्रचारसभेतील त्यांच्या भाषणात विरोधकांवर निशाणा साधतानाच काही महत्त्वपूर्ण घोषणाही केल्या. फडणवीस म्हणाले, ज्यांचा विकासाशी काही संबंध नाही. अडीच वर्षांत जे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमच्या महायुती सरकारनं करुन दाखवलं, त्यामुळे विरोधकांकडे बोलण्यासाठी काहीच नाही.शेतकऱ्यांना मोफत वीज दिली.पुढील काही काळात 24 तास वीज मोफत दिली जाईल असं काम सरकार करत आहे.

आमची एकही योजना बंद होणार नसून महाविकास आघाडीचे लोकंच लाडकी बहीण योजनेच्या विरोधात कोर्टात गेले.त्यांनी ज्याकाही घोषणा केल्या,त्यापैकी एकही पूर्ण केली नाही,असा दावाही फडणवीस यांनी केला. फडणवीसांनी यावेळी उद्धव ठाकरेंना खुलं चॅलेंज दिलं. ते म्हणाले,उद्धव ठाकरे यांनी ते संपूर्ण जिल्ह्यात शिवरायांचा पुतळा उभारणार असल्याची घोषणा केली.पण मी त्यांना सांगतो, चला मग मुंब्रात आपण शिवरायांचा पुतळा उभारु आणि छत्रपतींना मानवंदना देऊयात असंही त्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील 10 प्रमुख घोषणा

1) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतंर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांवरुन थेट 2100 मिळणार.

2) महिलांच्या सुरक्षेसाठी तब्बल 25,000 महिलांचा पोलीस दलात समावेश करणार

3) वीज बिलात 30% कपात करणार, सौर आणि अक्षय्य ऊर्जेवर भर देणार

4) शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला 12,000 वरुन रु.15,000 देणार

5) ज्येष्ठ पेन्शन धारकांना दरमहिन्याला 1500 वरुन 2100 रुपये मिळणार

6) अंगणवाडी आणि आशासेविकांना महिन्याला 15 हजार मानधन आणि सुरक्षा कवच

7) जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवणार

8) महाराष्ट्रात 25 लाख रोजगार निर्मिती, महिन्याला 10 लाख विद्यार्थ्यांना 10 हजार प्रशिक्षणार्थी विद्यावेतन

9) महायुती सरकार स्थापनेनंतर 100 दिवसांच्या आत ‘व्हिजन महाराष्ट्र @ 2029 सादर करणार

10) राज्यात कोणीही भुकेला झोपणार नाही,प्रत्येकाला अन्न आणि निवारा देणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT