Narsayya Adam Mastar : लोकसभा निवडणुकीत शिंदेंकडून मला पैशाची ऑफर होती; नरसय्या आडम मास्तरांचा गौप्यस्फोट

Solapur Political News : लोकसभा निवडणुकीत तुम्ही आमचे काम करा. विधानसभेला आम्ही तुम्हाला जागा देऊ, असे आश्वासन काँग्रेसने दिले होते. मात्र, काँग्रेसने विशेषतः प्रणिती शिंदे यांनी आमचा केसाने गळा कापला, असा आरोपही आडम मास्तर यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर केला‌
Narsayya Adam Mastar-Praniti Shinde
Narsayya Adam Mastar-Praniti ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 05 November : लोकसभा निवडणुकीत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्या सांगण्यावरून काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे आणि त्यांचे सहकारी हे दोन वेळा माझ्या घरी आले होते. सुशीलकुमार शिंदे हे तुम्हाला लाखो रुपये द्यायला तयार आहेत, ते आपण स्वीकारावेत, अशी दोन वेळा विनंती केली. तसेच, तिसऱ्यांदा २५ लाख रुपये घेऊन दत्ता सुरवसे आणि बेसकर आले होते, असा गौप्यस्फोट मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी केला आहे.

दरम्यान, सोलापूर शहर मध्य मतदारसंघ नरसय्या आडम मास्तरांना (Narsayya Adam Mastar) सोडला तर सोलापूर शहरावरील आपला ताबा जाईल, अशी भीती शिंदे कुटुंबीयांना वाटते. विशेषतः प्रणिती शिंदे यांनी आमचा केसाने गळा कापला आहे. आमची अडचण होत असेल, त्यामुळेच त्यांनी माझा गेम केला आहे, असा आरोपही आडम मास्तर यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर केला.

सोलापूर शहर मध्य मतदारसंघ महाविकास आघाडीने न सोडल्याने माजी आमदार आडम यांनी आज काँग्रेसवर विशेषतः खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्यावर हल्लाबोला केला. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत मतदानाला पाच दिवस असताना बेसकर आणि दत्ता सुरवसे हे सोलापूर शहरातील दत्त नगरमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात आले होते. आम्ही पंचवीस लाख रुपये आणले आहेत, ते तुम्ही स्वीकारा, अशी ऑफर त्यांनी दिली. मात्र, आमचा क्रांतीकारक बाणा असल्यामुळे एक रुपयाही न स्वीकारता लोकसभा निवडणुकीत माकपच्या कार्यकर्त्यांनी प्रणिती शिंदे यांचे काम केले.

Narsayya Adam Mastar-Praniti Shinde
Modi-Thackeray Solapur Sabha : मोदी अन् ठाकरे एकाच दिवशी सोलापुरात; विधानसभेच्या प्रचारात रंगणार राजकीय जुगलबंदी

विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर मध्य मतदारसंघ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सुटेल, आम्हाला महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळेल, अशी आम्हाला अपेक्षा होती. आमच्या वतीने केंद्र आणि राज्यातील नेतृत्वाने महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे भरपूर प्रयत्न केले. राज्यातील सोलापूर शहर मध्यची जागा आम्ही महाविकास आघाडीकडे मागितली. मात्र, तीही आम्हाला देण्यात आलेली नाही, असेही आडम यांनी नमूद केले.

लोकसभा निवडणुकीत तुम्ही आमचे काम करा. विधानसभेला आम्ही तुम्हाला जागा देऊ, असे आश्वासन काँग्रेसने दिले होते. मात्र, काँग्रेसने विशेषतः प्रणिती शिंदे यांनी आमचा केसाने गळा कापला, असा आरोपही आडम मास्तर यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर केला‌

‘रे नगर’चे अनुदान काँग्रेस सरकारमुळे कमी झाला. रे नगरला पूर्वी 1500 कोटी रुपयांचे अनुदान मिळणार होते. मात्र, काँग्रेसमुळे हे अनुदान 900 कोटींनी कमी झाले. त्यातून काँग्रेसने गरिबांच्या तोंडचा घास काढला, असाही हल्लाबोल आडम यांनी केला. सोलापूर शहरातील 488 गाळे आणि कामगारांच्या प्रलंबित पेन्शनवरूनही त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

Narsayya Adam Mastar-Praniti Shinde
Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांना मोठा धक्का; ऐन निवडणुकीत भावाने साथ सोडली, प्रवीण मानेंना दिला पाठिंबा

आरोप बिनबुडाचे : प्रणिती शिंदे

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांचा मी आदर करते. यापुढेही नेहमीच करत राहीन. पण, आता या घडीला असे बिनबुडाचे आरोप करून त्यांना काय साध्य करायचे आहे, हेच कळत नाही, असा खुलासा काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com