Sangli Shiv Sena news : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झालेले डबल केसरी चंद्रहार पाटील यांनी शिवसेनेच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर लाँच होण्याची तयारी सुरू केली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमार्फत थेट जम्मू-कश्मीरमध्ये भारतीय सैन्यासाठी 9 ऑगस्टला 'सिंदूर महारक्तदान' शिबिर आयोजित करण्यात आले आहे. चंद्रहार पाटील यांचा हा मास्टर स्ट्रोकने शिवसेना नेत्यांना देखील धडकी भरली आहे. तेवढीच चंद्रहार पाटील यांनी देखील 'सिंदूर महारक्तदान' शिबिर यशस्वी करण्याचं तगडं नियोजन केलं आहे.
चंद्रहार पाटील यांनी या शिबिराची माहिती देताना सांगितलं की, जम्मू-कश्मीरमध्ये भारतीय सैन्यासाठी येत्या 9 ऑगस्टला 'सिंदूर महारक्तदान' शिबिर आयोजित केलं आहे. शिवसेना पक्षाचे हे महारक्तदान शिबिर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत होईल.
जम्मू-कश्मीरच्या उधमपूर आणि आर्मी (Indian Army) कमांड हॉस्पिटल इथं हे शिबिर होईल. यासाठी येत्या पाच ऑगस्टला सांगलीतून धर्मवीर एक्सप्रेस या विशेष रेल्वेने जिल्ह्यातील एक हजार युवक जाणार आहेत, अशी माहिती चंद्रहार पाटील यांनी दिली.
तसेच 9 ऑगस्ट पासून पुढील वर्षभर देशातल्या विविध ठिकाणी असणाऱ्या आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्सच्याकॅम्प मध्ये जाऊन सांगली जिल्ह्यातील युवक हे रक्तदान करणार आहेत. देशाच्या स्वातंत्र्यानंतर देशाच्या कर्तव्यासाठी प्राण देणाऱ्या सैनिकांच्या प्रति राबवण्यात येणारे पहिल्याच अभियान असल्याचं दावा चंद्रहार पाटील यांनी केला आहे. क्रांती दिन आणि रक्षाबंधनचे औचित्य साधून हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे पाटील यांनी म्हटले.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत चंद्रहार पाटील यांनी जूनच्या सुरवातीला प्रवेश केला होता. शिवसेनेत प्रवेश करताच एक महिन्यातच चंद्रहार पाटील यांनी राष्ट्रीय पातळीवर शिवसेनेसाठी उपक्रम हाती घेतल्याने त्यांच्या नियोजनाची चर्चा आहे. त्यांच्या या नियोजनामुळे शिवसेना संघटनेत राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी मिळणार, अशी चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.