Teacher Recruitment Scam : शिक्षक होण्याचा भाव फुटला, 15 ते 18 लाख 'प्लस'? पैशांच्या मागणीनं उमेदवारांमध्ये नैराश्य

Bribery Allegations in Maharashtra Teacher Recruitment Second Phase : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रियेच्या मुलाखती सुरू आहेत.
Teacher recruitment
Teacher recruitmentSarkarnama
Published on
Updated on

Teacher recruitment second phase bribery : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रियेच्या मुलाखती सुरू आहेत. यामध्ये काही अनुदानित संस्थाचालकांनी उमेदवारांची आर्थिक मागणी होत असल्याचे प्रकार समोर आले आहे.

भरतीसाठी तब्बल 10, 15 ते 18 लाख 'प्लस'पर्यंत भाव फुटल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेतील या प्रकाराने उमेदवार हैराण असून, दाद मागायची तरी कोणाकडे, या विवंचनेत आहे.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसह अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या (Teacher) दुसऱ्या टप्प्यातील भरती सुरू आहे. यात उमेदवारांचं आर्थिक छळवणूक सुरू असल्याचे प्रकार समोर येत आहेत. मुलाखतीदरम्यान लाखो रुपयांची मागणी केली जात असल्याने, उमेदवार नैराश्यात जात आहे. यामुळे शिक्षक भरतीच्या मुलाखतीबाबत सर्व प्रक्रिया मूल्यमापनसुद्धा इन कॅमेरा होणे आवश्यक आहे, अशी मागणी पुरोगामी शिक्षक संघटनेनी केली आहे.

काही संस्थाचालकांनी गुणवत्तेच्या आधारे समोर आलेल्या उमेदवारांना कोणतीही तक्रार न करता आपल्याकडे मुलाखत घेऊन रुजू करून घेत असले, तरी अशा संस्था बोटावर मोजण्या इतक्याच आहेत, असे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे संस्थाचालकांना देण्यात आलेल्या मुलाखतीचे सर्व अधिकार काढून घ्यावेत, अशी मागणी होत आहे.

Teacher recruitment
Bala Nandgaonkar Thane : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर सर्वाधिक कोण बोलतं? नांदगावकरांचं शिंदेंच्या बालेकिल्ल्यात 'मनसे स्टाईल' उत्तर

राज्यात (Maharashtra) शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू असून त्यात शिक्षकांच्या 8 हजार 556 रिक्तपदांची भरती केली जात आहे. पवित्र पोर्टलच्या प्रमाणित कार्यपद्धतीनुसार, मुलाखतींचे छायाचित्रण करणे अपेक्षित आहे. मुलाखत, वर्ग निरीक्षण आणि विद्यार्थी गुणसंख्येला प्रत्येकी दहा गुण दिले जाणार आहेत.

Teacher recruitment
Aaditya Thackeray Attack BJP : भाजप महायुतीमध्ये 'चड्डी-बनियान' गँग; ठाकरेंनी 'संजय कृत्या'वरून सरकारला सुनावलं

या सर्व प्रक्रियेवर राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी, शिक्षक अभियोग्यता चाचणी झाल्यानंतर या संस्थेमध्ये पात्र उमेदवाराला पाठवले जाते, त्याची मुलाखत इन कॅमेरा झाली पाहिजे. त्यातून योग्य उमेदवारांची निवड होईल, असे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com