Eknath Shinde & Sanjay Mandlik Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sanjay Mandlik : शिंदेंकडून मिळणार मंडलिकांना गिफ्ट, विधान परिषद किंवा राज्यसभेवर पाठवणार

Eknath Shinde Special Gift to Sanjay Mandlik : लोकसभेवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय मंडलिक यांना पराभवाचा धक्का बसला. यामुळे त्यांचे आता राजकीय पुनर्वसनाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Rahul Gadkar

Kolhapur News : शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर संकटावेळी सोबत आलेल्या माजी खासदार संजय मंडलिक यांच्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष आहे. आता लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे मंडलिक यांच्यासह त्यांच्या गटाला राजकीय ताकदीची गरज आहे. यामुळे शिंदे यांच्याकडून मंडलिक गटाला उभारी देण्यासह मंडलिक यांना खास गिफ्ट देण्याच्या हालचाली सुरू झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी मंडलिक यांना विधान परिषद किंवा राज्यसभेवर घेतले जाण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीपासून माजी खासदार संजय मंडलिक हे सातत्याने उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या संपर्कात आहेत. शिवसेनेतील राजकीय घडामोडी घडत असताना प्रत्येक वेळी मंडलिक शिंदे यांच्यासोबत राहिलेले आहेत. जर मंडलिक यांना विधान परिषद किंवा राज्यसभेवर घेतले मंडलिक गटाला खास करून पश्चिम महाराष्ट्रात शिंदेंच्या शिवसेनेला बळ मिळणार आहे.

राज्यपाल नियुक्तीचा घोळ संपल्यानंतर महायुती सरकारने सात आमदारांची नियुक्ती केली. उर्वरित पाच आमदारांची नियुक्ती कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील अनेक इच्छुकांची उत्सुकता वाढून राहिली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या आणि उमेदवारीवरून थांबलेल्या इच्छुकांची उत्सुकता वाढली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील काही इच्छुकांनी निकरीचे प्रयत्न सुरू केले आहेत.

लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर माजी खासदार संजय मंडलिक यांनी देखील विधान परिषद, राज्यसभेसाठी फिल्डिंग लावली आहे. त्यांची मनोकामना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पूर्ण केली जाण्याची शक्यता आहे. त्याबाबतची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

लोकसभा निवडणूक झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीतील शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी माजी खासदार संजय मंडलिक यांचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे. पायाला भिंगरी बांधत प्रत्येक मतदारसंघातील प्रचार त्यांचा महत्त्वाचा ठरला आहे. त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेच्या चारही उमेदवारांचा विजयाचा त्यांचा वाटा आहे. अशी दखल शिंदेंच्या शिवसेनेतील वरिष्ठ मंडळींनी घेतली आहे.

विधान परिषदेसाठी जिल्ह्यातील अनेक मंडळींनी देव पाण्यात घातले आहेत. मात्र ज्याच्याकडे गट आणि तट आहे. आणि पक्ष मजबूत करण्याची आहे याकडेच महायुतीतील पक्षाची नजर असणार आहे. शिवसेना वाढवण्यामागे मंडलिक हे एकमेव उदाहरण असू शकतात. त्यामुळे पक्षाची नजर त्यांच्यावर आहे.

पक्ष संघटन बळकट करण्यासाठी मंडलिक गटाची भूमिका महत्त्वाची आहे. सध्या मंडलिक गटाकडे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या रूपाने ताकद आहे. पण पक्षातीलच म्होरक्याला ताकद देऊन पक्ष वाढवण्याची भूमिका शिंदे सेनेचे आहे. त्यामुळे मंडलिक यांना विधान परिषद किंवा राज्यसभेवर घेतली जाण्याची शक्यता आहे.

अडचणीत धावून आल्याची जाण

शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर लोकसभेत गट तयार करण्यासाठी 12 व्या सदस्याची गरज होती. त्यावेळी मंडलिक यांची समजूत काढून त्यांना शिंदे गटात घेण्याचे प्रयत्न सुरू होते. अडचणी काळात मंडलिक देखील शिंदे यांच्या मदतीला धावून गेले. याची जाण उपमुख्यमंत्री शिंदे यांना देखील आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे मंडलिक यांना उभारी देण्याचे ध्येय शिंदे यांच्या आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT