Sanjay Mandlik News : मंडलिक गट कोणता बॉम्ब फोडणार? ; कागलच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ!

Kagal Assembly Constituency : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता मंडलिक गट काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून आहे.
Sanjay Mandlik
Sanjay MandlikSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Mandlik and Vidhan Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर मरगळ झटकून कागल विधानसभा मतदारसंघातील मंडलिक गट पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. लोकसभा निवडणुकीत स्वकीयांनी घात केल्याचा आरोप मंडलिक गटाकडून यापूर्वी देखील करण्यात आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवाराच्या समर्थनाथ उद्या(मंगळवार) कागल मधील शेंडुर येथे मंडलिक गटाचा मेळावा होणार आहे.

कागल विधानसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार कोण असणार? याबाबत स्पष्ट कल्पना आली आहे . मात्र लोकसभेतील परभवानंतर संजय मंडलिक(Sanjay Mandlik) गट जिवंत राहण्यासाठी उद्या माजी खासदार संजय मंडलिक काय भूमिका मांडणार? याकडे मतदारसंघासह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

उद्या होणाऱ्या मेळाव्यासाठी शिवसेना एकनाथ शिंदे(Eknath Shinde) गटातील जिल्ह्यातील आमदार पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. माजी खासदार संजय मंडलिक, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश अबिटकर, वीरेंद्र मंडलिक यांची उपस्थिती राहणार आहे. शिवाय मतदार संघातील 121 गावांमधील मंडलिक गट आणि शिवसैनिक या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीत माजी खासदार संजय मंडलिक यांचा पराभव झाल्यानंतर त्याचे खापर महायुतीतील नेते पालकमंत्री मुश्रीफ आणि तत्कालीन भाजपनेते समरजीत घाटगे यांच्या कार्यकर्त्यांवर मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांनी केले होते.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्रपणे मंडलिक गटाचा मेळावा उद्या संपन्न होणार आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या मेळाव्यात पालकमंत्री मुश्रीफ आणि घाडगे यांच्याबाबतीत काय भूमिका घेणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. शिवाय घाटगे मुश्रीफ यांच्यासोबत मंडलिक गटातून कोणाची उमेदवारी जाहीर करणार आहेत का? याबाबत ही तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.

Sanjay Mandlik
Congress News : काँग्रेस विधानसभा उमेदवारांच्या निवडीसाठी एक नव्हे, तर तीन सर्वेक्षणांचा घेणार आधार!

खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे उमेदवारीची मागणी -

दोन महिन्यापूर्वी मुख्यमंत्री यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे हे कागल विधानसभा मतदारसंघातील दौऱ्यावर आले होते. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी या मतदारसंघातील आढावा घेतला होता. या आढावा बैठकीत तरुणाला संधी देणार अशी भूमिका खासदार शिंदे यांनी मांडली होती. यानंतर मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांनी वीरेंद्र मंडलिक यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली होती.

घाटगे- मुश्रीफ गटावर मंडलिक गट नाराज -

लोकसभा निवडणुकीत(Loksabha Election) महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना कागल विधानसभा मतदारसंघातून अवघे 13000 चे मताधिक्य आहे. या मतदारसंघातून पालकमंत्री हसन मुश्रीफ, तत्कालीन भाजपचे नेते समरजीत घाटगे आणि मंडलिक गट यांचे मिळून 50 हजार पेक्षा जास्त मताधिक्य अवघ्या कागलमधून मिळतील अशी अपेक्षा मंडलिक गटाला होती. मात्र केवळ 13 हजाराचे मताधिक्य मिळाल्याने मंडलिक गटाने मुश्रीफ आणि घाटगे गटावर मदत न केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे मंडलिक गट या दोन्ही गटावर नाराज आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता मंडलिक गट काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Sanjay Mandlik
Rahul Gandhi in kitchen - Video : अन् राहुल गांधी म्हणाले 'मी जास्त तिखट खात नाही'

मंडलिक गट उमेदवार जाहीर करणार? -

महायुतीचे संभाव्य उमेदवार म्हणून पालकमंत्री हसन मुश्रीफ(Hasan Mushrif) यांच्याकडे पाहिले जाते. तर महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार म्हणून शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांचे नाव चर्चेत आहे. अशातच उद्या होणाऱ्या मेळाव्याकडे मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांची लक्ष लागले आहे. या मेळाव्यात माजी खासदार संजय मंडलिक यांच्याकडून कागल विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवारीवर दावा केला जाऊ शकतो. शिवाय उमेदवाराची घोषणा केली जाऊ शकते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com