
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात सर्वच विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून आल्यानंतर माजी खासदार संजय मंडलिक यांचे जागोजागी फलक झळकले आहेत. या फलकावर जिल्ह्याचे खरे दादा, किंग मेकर, अशी उपाधी मंडलिक यांना देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे म्हणजे चंदगड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आणि मंडलिक यांचे मेहुणे राजेश पाटील पराभूत झाले. त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील हे विजयी झाले. नंतर राजेश पाटील (Rajesh Patil) यांनी महायुतीला पाठिंबा दिला. राजेश पाटलांच्या पराभवामागे मंडलिकच किंगमेकर होते का? अशी आता विचारना होऊ लागली आहे.
लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील दोन जागेपैकी एकाच जागेवर महायुतीला समाधान मानावे लागले. कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांना पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र हा पराभव मंडलिक गटाच्या चांगलेच जिव्हारी लागल्याचे दिसून आले. विधानसभा निवडणुकीत प्रचारात आघाडी घेत महाविकास आघाडीच्या विरोधात उतरल्याने मंडलिक गटाचा दबदबा तीन ते चार मतदारसंघात दिसून आला.
विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) यश मिळाल्यानंतर माजी खासदार संजय मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांनी लावलेले फलक सध्या जिल्ह्यातच चर्चेचा विषय ठरले आहे. दहा-शून्य असे दाखवत "जिल्ह्याचे खरे दादा'असे शहराच्या प्रवेशद्वारावरच झळकवले आहे. इतकेच नव्हे तर स्वतः संजय मंडलिक यांनी आपल्या इंस्टाग्राम या अकाउंट वरून एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. यात "परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम" असा उल्लेख करून हा आपला करिष्मा चालला हे दाखवून दिले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला दहा जागा मिळाल्यानंतर नेत्यांमध्ये आत्मिक समाधान आहे. कार्यकर्त्यांच्या भावना अधिक उत्साही होत चालल्या आहेत. अशातच माजी खासदार संजय मंडलिक यांचे फलक सध्या जिल्ह्यातच चर्चेचा विषय ठरत आहेत. कार्यकर्त्यांनी लावलेल्या फलकातून कागलच्या विजयाची आपले योगदान असल्याचा संदेश दिला आहे.
जिल्ह्यातील महायुतीच्या विजयाचे शिल्पकार’, ‘१०-०’, ‘खरे दादा’, ‘किंगमेकर’ अशा आशयाचे फलक जागोजागी झळकले आहेत. लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक यांचा एक लाख 55000 मतांनी पराभव झाला. स्वतःच्या कागल विधानसभा मतदारसंघातून त्यांना कमी मताधिक्य मिळाले. मुश्रीफ आणि घाटगे एकत्र असून सुद्धा त्यांचे मतांचे प्रमाण संशोधनाचा विषय बनला होता.
संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी घाटगे आणि मुश्रीफ यांच्यावर ताशेरे उडले होते. त्यामुळे मंडलिक महायुतीकडे असले तरी त्यांची पडद्यामागची भूमिका नेमकी काय? याची निकालापर्यंत अनेक कार्यकर्त्यांना उत्सुकता लागून राहिली होती. मात्र महायुतीचे उमेदवार मुश्रीफ विजयी झाले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.