Jayant Patil
Jayant Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangali : पराभवाच्या भीतीनेच निवडणूका लांबणीवर... जयंत पाटील

Umesh Bambare-Patil

सांगली : ‘‘राज्यात सत्तातरानंतर भाजप विरोधात जनमत आहे. त्यामुळे महापालिकांसह नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये पराभवाच्या भीतीने निवडणुका लांबणीवर टाकल्या जात आहेत,’’ असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

राज्यातील सध्याच्या राजकीय परस्थितीबाबत विचारले असता प्रदेशाध्यक्ष श्री. पाटील म्हणाले, ‘‘राज्यातील अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक ताजे उदाहरण आहे. कुणीतरी सांगावे आणि भाजपने निवडणुकीतून माघारी घ्यावी हे कसे घडले, हे सर्वांनाच माहित आहे. सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेची निवडणूक लांब आहे. त्यावेळी आघाड्यांबाबत निर्णय घेऊ; मात्र सध्याचे वातावरण भाजपला अनुकुल नाही.

वातावरण अनुकुल झाल्याशिवाय निवडणूका घेण्याची सध्याच्या सरकारची मानसिकता दिसत नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेसह राज्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा तसेच पंचायत समितीच्या निवडणूका पुढे ढकलल्या जात आहेत.’’ प्रदेशाध्यक्ष श्री. पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबुतीने उभारणीसाठी शिर्डीतील शिबीरात चर्चा केली जाईल. पक्षाला २३ वर्षे पूर्ण झाली असून जून २०२३ मध्ये पक्षाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाला प्रारंभ होत आहे. यातील साडेसतरा वर्षे पक्ष सत्तेत राहून सामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.

राज्यातील ओला दुष्काळासह विविध प्रश्‍नांवर राष्ट्रवादीसह विरोधक आक्रमक आहेत. बेरोजगारी, महागाई, प्रमुख उद्योग गुजरातला जाताहेत. यामागेही केंद्र सरकार आणि राज्यातील सत्ताधारी कारणीभूत आहेत. गेल्या काही दिवसांत राज्यातील केंद्राच्या इशाऱ्यावर होत असलेल्या कारवायांबाबत घटनात्मक बाबींवरही चर्चा होईल. राज्यभरातून पदाधिकाऱ्या निमंत्रितांसह पावणेदोन हजार जण शिबीरास उपस्थित असतील.’’

मंत्रिमंडळ विस्तार नाराजीमुळे रखडला

राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत प्रदेशाध्यक्ष श्री. पाटील म्हणाले,‘‘मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताहेत. अधिकार असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र, गप्प आहेत. विस्तार केला जर ज्यांना मंत्रीपद मिळणार नाही, असे आमदार नाराजीची भीती त्यांना सतावतेय. ते पुन्हा मूळ ठाकरेंच्या शिवसेना तसेच भाजपमध्येही जावू शकतात.’’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT