अंगापूर : जिल्ह्यात आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे विचार खंडीत करण्याचे चालू असलेले प्रकार पाहिल्यानंतर दुःख वाटते. परंतू, यशवंत विचारांची पुन्हा नव्याने मोट बांधून राष्ट्रवादीचा स्वाभिमान उभा करू या, असे सांगून विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आमदार शशिकांत शिंदे यांचा विधानसभेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी देगाव येथे लोटलेला जनसमुदाय हा राजकीय जीवनातील भविष्याचा वेध घेणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
देगांव (ता.सातारा) येथे आमदार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, पराभवानंतर शशिकांत शिंदे यांनी नाराज होण्याचे कारण नाही. राजकारण, समाजकारणात एकदा वाहून घेतल्यानंतर माघार घेणे योग्य होणार नाही. त्यांचा पराभव आमच्या जिव्हारी लागला असून राष्ट्रवादीचा स्वाभिमानी विचार जागृत करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसह जिल्ह्यात पुन्हा राष्ट्रवादी उभी करीत शशिकांत शिंदे यांच्या पराभवाचा वचपा काढू या.
रामराजे म्हणाले, नवीन कार्यकर्ते तयार करताना पैशाच्या मागे जाणारे नकोत, पैशासाठी सत्ता व राजकारण नको. शरद पवारांचा स्वाभिमानी जिल्हा उभा करण्यासाठी पुन्हा एकमेकांमधील वाद बाजूला ठेवून त्यांना विधानसभेत पुन्हा पाठवू या. त्यासाठी आम्ही सगळे सोबत आहोत. देगावची ही गर्दी त्यांच्या राजकीय जीवनाला कलाटनी देणारी व मतदारसंघाचा भविष्याचा वेध घेणारी ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.