Pratapgad afzal Khan Kabar
Pratapgad afzal Khan Kabar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pratapgad Fort : कबरीला मुंबईहून येत होता मोगऱ्याचा हार....

Umesh Bambare-Patil

सातारा : कबरीला दररोज मुंबईहून (Mumbai) मोगऱ्याचा हार पाठवला जात होता. 1990 च्या अगोदर याठिकाणी वन विभागाच्या जागेत खोल्या बांधण्यात आल्या. या खोल्यामध्ये 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी राहिल्याचा आरोपही होता. कबर दर्शनासाठी बंद करण्याचा निर्णय 2006 ला काही स्थानिक नागरिक आणि हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन करून हे उदात्तीकरण थांबवावं, अशी मागणी केली होती. तब्बल २६ वर्षे हा परिसर नागरीकांसाठी बंद होता.

सन 1990 पासून वादात असलेल्या अफजल खानाच्या कबरीशेजारील अतिक्रमणे आज (गुरुवारी) जिल्हा प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात काढून टाकली. अफजल खानाची कबर काही फूट जागेत होती. त्याठिकाणी वन विभागाच्या हद्दीत एकरभर जागेत ही अतिक्रमणे झाली होती. याठिकाणी अफजल खानाच्या कबर परिसराचे उदात्तीकरण केलं जातं असल्याची तक्रार होत होती.

हे अतिक्रमण काढावं या मागणीसाठी 2006 मध्ये तीव्र आंदोलन केलं होतं. त्यावेळीपासून अफजल खान कबरीकडं प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या ठिकाणी गेली 26 वर्षे 144 कलम लागू आहे. या कबरीजवळ नेहमी चोख बंदोबस्त ठेवला आहे. 2017 ला एका निकालाद्वारे सर्वोच्च न्यायालयानं हे अतिक्रमण काढण्यात यावं, असे आदेश दिले होते. मात्र, तरीही अतिक्रमण पाडण्यात आलं नव्हतं. आज अत्यंत गोपनीयता पाळत ही अतिक्रमणं काढण्यात आली आहेत.

कबरीचा इतिहास

स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानाचा कोथळा छत्रपती शिवाजी महाराजांनी फाडला. त्यानंतर अफजल खान आणि त्याचा अंगरक्षक सय्यद बंडा (Sayyed Banda) याची कबर प्रतापगडच्या पायथ्याशी बांधण्यात आली. सहा फुटांच्या या कबरीवर 1956 पर्यंत कौलारू छप्पर असल्याचे उल्लेख आढळतात. 1980 ते 1985 दरम्यान याठिकाणी अतिक्रमण सुरू झालं. सुरवातीला उरुस भरवून अफजल खानाचं उदात्तीकरण करण्यात आलं तर याठिकाणी उभा करण्यात आलेल्या दर्ग्याचं दर्शन घ्यायची सक्ती काही फकिर करत असल्याच्या तक्रारी अनेक जण करत होते.

याठिकाणी भरण्यात येणाऱ्या उरुसामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना शिवीगाळ केली जात होती, अशीही तक्रार अनेक जण करतात. या कबरीला दररोज मुंबईहून मोगऱ्याचा हार पाठवला जात होता. 1990 च्या अगोदर याठिकाणी वन विभागाच्या जागेत खोल्या बांधण्यात आल्या. या खोल्यामध्ये 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी राहिल्याचा आरोपही होता.

कबर दर्शनासाठी बंद केली...

सन 2006 ला काही स्थानिक नागरिक आणि हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन करून हे उदात्तीकरण थांबवावं, अशी मागणी केली. सातारा जिल्ह्यातील पाचवड इथं या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. त्यानंतर जिल्हा प्रशासनानं ही कबर दर्शनासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला. गेली 26 वर्षे या ठिकाणी सामान्य नागरिकांना जाता येत नाही, हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT