Breaking News : अफजल खान कबरी भोवतीची अतिक्रमणे पाडली

कबर परिसरात कडक बंदोबस्त असून, कबरीच्या परिसरातील रस्ता बंद करण्यात आला आहे. आजच्या कारवाईबाबत प्रशासनाकडून अत्यंत गोपनीयता ठेवण्यात आली होती.
pratapgad fort Afzal Khan's grave
pratapgad fort Afzal Khan's grave sarkarnama
Published on
Updated on

महाबळेश्वर : प्रतापगडावर असलेल्या अफजलखानाच्या कबरी भोवतीची अतिक्रमणे हटवण्याचे काम आज पहाटेपासून सुरू करण्यात आले असून, त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त प्रतापगडावर तैनात करण्यात आला आहे.

प्रतापगडावरील अफजल खान कबरीजवळील बेकायदेशीर बांधकामांचा मुद्दा नेहमीच वादग्रस्त राहिला आहे. त्यावरून अनेकदा आंदोलने ही झाले. न्यायालयीन खटले दाखल झाले आहेत. त्यामुळे या कबड्डीच्या परिसरात नेहमी पोलीस बंदोबस्त तैनात असतो. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास अफजलखानाच्या कबरी भोवतीची अतिक्रमणे पाडण्यास सुरुवात करण्यात आली. परिसरात कडक बंदोबस्त असून, कबरीच्या परिसरातील रस्ता बंद करण्यात आलेला आहे. आजच्या कारवाईबाबत प्रशासनाकडून अत्यंत गोपनीयता ठेवण्यात आली होती.

१० नोव्हेंबर १६५९ या तारखेप्रमाणे आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाचा वध केला होता. आज या ऐतिहासिक घटनेला ३६३ वर्षे पूर्ण होत असतानाच शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने आज प्रतापगडाच्या पायथ्याशी असणारी अफजलखान याच्या कबर परिसरातील अनधिकृत बांधकाम जमीन दोस्त करण्यास सुरवात केली आहे.

pratapgad fort Afzal Khan's grave
प्रतापगड किल्ल्याला भेट देऊन राज्यपालांचे छत्रपती शिवाजी महाराजांना मनोभावे अभिवादन

यासाठी या परिसरात १४४ कलम लागू केले असून कोणालाही तेथे जाण्यास परवानगी दिली जात नाही. ही कारवाई चोख पोलिस बंदोबस्तात सु्रू असून त्यासाठी चार जिल्ह्यातील दीड हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात केले आहेत. यासंदर्भात काल रात्री जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र, अशा प्रकारे कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याची माहिती त्यांनी दिली होती.

pratapgad fort Afzal Khan's grave
प्रतापगड, अजिंक्यतारा किल्ले राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करा; उदयनराजेंची उपराष्ट्रपतींकडे मागणी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com