Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील जवळपास १८२ गावांचा पाणीप्रश्न कायमचा मिटवणाऱ्या निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून येणाऱ्या पाण्याचे पूजन माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या हस्ते करण्यात आले. हा तालुक्यासाठी ऐतिहासिक क्षण असल्याची भावन थोरात यांनी व्यक्त केली.
पिंपळगाव कोंझिरा या इथे स्थित असणाऱ्या येथील बोगद्यालालगत संगमेनेर (Sangamner News) तालुक्यात आलेल्या निळवंडेच्या पाण्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, डॉ जयश्रीताई थोरात यांच्यासह तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. (Latest Marathi News)
यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की ,"निळवंडे धरण व कालवे व्हावे हे आपले स्वप्न होते. 1985 पासून या कामाचा पाठपुरावा सुरू केला. 1992 ला सुरुवात झाली. परंतु कामाला 1999 पासून गती मिळाली. अनेक अडचणीवर मात करून धरण पूर्ण केले. कालव्यासाठी मोठा निधी मिळवला. इतक्या दिवसाच्या अथक परिश्रमानंतर तालुक्यात आलेले पाणी हा जीवनातील आनंदाचा क्षण आहे. याचबरोबर संगमनेर तालुक्यासाठी ऐतिहासिक क्षण असून, यामुळे दुष्काळी भागातील जनतेच्या जीवनात मोठे परिवर्तन होणार आहे. त्यांच्या अर्थव्यवस्थेत मोठा बदल होणार आहे."
थोरात पुढे म्हणाले, "आपण कधीही श्रेयासाठी काम केले नाही. या यशामध्ये अनेकांचे योगदान आहे. अनेकांनी त्याग केलेला आहे. सर्वांच्या कामातून व त्यागातून आजचा हा सुवर्ण दिवस उगवला आहे. डाव्या कालव्याचे काम सहा महिन्यापूर्वी झाले होते .धरणात पाणी शिल्लक असताना यातून चाचणी व्हावी यासाठी आपण पाठपुरावा केला. उजव्या कालव्याचे कामही तातडीने व्हावे हाच आपला कायम आग्रह आहे. अनेक जण श्रेयासाठी झटत आहेत. मात्र आपण कामाला महत्त्व देतो धरण व कालव्यांची कामे कोणी केली हे ही सर्व जनतेला माहित असल्याचेही आमदार थोरात यांनी म्हटले आहे.
तर माजी आमदार डॉ तांबे म्हणाले की, "निळवंडे धरण व कालव्यांचे खरे श्रेय हे आमदार बाळासाहेब थोरात यांचेच असून त्यांनी जीवनाचे ध्येय मानून धरण व कालव्यांची कामे पूर्ण केली. दुष्काळी माणूस व गरिबांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा यासाठी हे काम केले असून ही स्वप्नपूर्ती होत असल्याने हा तालुक्याच्या भाग्याचा दिवस ठरत आहे."
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.