Pune Lok Sabha By-Election: पुणे लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे एक पाऊल पुढे; तीन नावांवर सुरु आहे सर्व्हे; पोटनिवडणूक लढणार...?

Pune NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांचे भावी खासदार म्हणून बॅनर लागले होते.
NCP News
NCP News Sarkarnama
Published on
Updated on

Pune News: पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक लागल्यास उमेदवारी कुणाला मिळणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. याच दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांचे भावी खासदार म्हणून बॅनर लागले होते. त्यामुळे पुण्यामध्ये एकच चर्चा सुरु झाली आहे.

पुणे लोकसभा (Pune News) मतदारसंघ हा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडे (Congress) आहे. प्रशांत जगताप यांच्या बॅनरमुळे राष्ट्रवादी पुणे लोकसभा मतदारसंघावर दावा सांगणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यातच राष्ट्रवादीने पोटनिवडणुकीसाठी सर्व्हेही सुरु केला असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा दावा अधिक प्रबळ झाला असल्याचे बोलले जात आहे. मात्र, काँग्रेस ही जागा सोडणार का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.

NCP News
Solapur News : सावरकरांबद्दल काँग्रेसला कृतज्ञता वाटते : ज्येष्ठ नेत्याने पहिल्यांदाच दिली कबुली

राष्ट्रवादीच्या वतीने तीन नावांवर सर्वे केला जात आहे. त्यामध्ये शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण, माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या नावांची चाचपणी केली जात आहे. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. यामुळे पुणे लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी लढवणार असल्याची जोरदार चर्चा होत आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नसल्याचेही बोलले जात आहे. नुकत्याच झालेल्या कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत विजयी झालेले रवींद्र धंगेकर यांच्या नावाच्या पुढे काँग्रेसची चर्चा जात नाही. त्यामुळे धंगेकर यांना पुन्हा लोकसभेला काँग्रेस लढवणार का? यावरही खलबत सुरु आहेत. मात्र, त्यांना लोकसभा लढायची झाल्यास त्यांच्या जागेवर पुन्हा पोटनिवडणूक घ्यावी लागले. त्यामुळे राष्ट्रवादी उमेदवारांची चाचपणी करत असल्याचे बोलले जात आहे.

NCP News
CJI Dhananjaya Chandrachud : माझ्या समोर तुमचे ट्रिक चालणार नाही; सरन्यायाधीशांनी वकिलाला फटकारले : न्यायालयात काय घडले?

राष्ट्रवादीकडून प्रशांत जगताप, वंदना चव्हाण आणि दीपक मानकर यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. यामध्ये वंदना चव्हाण या सध्या राज्यसभेच्या खासदार आहेत. तसेच त्या पुण्याच्या महापौर राहिलेल्या आहेत. त्यामुळे पुण्याच्या प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे. त्यातच त्यांच्या नावावर राष्ट्रवादीत सहमती होऊ शकते. दुसरे नाव आहे, प्रशांत जगताप यांचे, ते सध्या पुण्याचे शहराध्यक्ष आहेत. त्यांचे शहरात चांगले संघटन आहे, त्याच बरोबर एक तरुण चेहरा म्हणून त्यांच्या नावाचीही चाचपणी होत आहे.

त्यानंतर दीपक मानकर हे पुण्याचे माजी उपमहापौर आहेत. त्यांचेही संघटन आणि कार्यकर्त्यांचे जाळे चांगले आहे. त्यामुळे त्यांच्या नावाचीही चाचपणी होत, असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसकडून अरविंद शिंदे, मोहन जोशी आणि रविंद्र धंगेकर यांच्या नावाची चर्चा होत आहे. अनेक नावांची चर्चा होत असली तरी सर्व्हेच्या माध्यमातून राष्ट्रवादीने एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यामुळे पुणे लोकसभा पोटनिवडणुकीत काय होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com