Kolhapur News: महायुती विरुद्ध महाविकास आघाडी व शेतकरी संघटना यांच्यातील विरोधाचे कारण ठरलेल्या शक्तिपीठ महामार्गासाठी आता आरपारची लढाई सुरू झाली आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील गावांची जमीन अधिग्रहण करण्यासाठी आज अधिसूचना जाहीर झाल्यानंतर तेरा जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा एकवटणार आहेत.
राज्यभरातून तीव्र विरोध होत असताना शक्तिपीठ महामार्ग रेटला जात असल्याची भावना शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे आता शेतकरी आषाढी एकादशीच्या निमित्ताने थेट विठ्ठलालाच साकडे घालणार आहेत. या जिल्ह्यातील शेतकरी एकत्र येऊन सदबुद्धी वारी काढणार असल्याची माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे.
विरोधानंतर ही शक्तीपीठ महामार्गाबद्दल जमीन अधिग्रहण करण्यासाठी आज अधिसूचना जाहीर झाली. शेतकऱ्यांचा विरोध असतानाही अधिसूचना काढणे म्हणजे त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचा काही संघटनांचा आरोप आहे.
हा शक्तिपीठ महामार्ग रद्दच व्हावा यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा यांसह अन्य जिल्ह्यांमधून देखील तीव्र विरोध होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या 18 जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यातील वाखरी ते पंढरपूर आजची चार किलोमीटरची सदबुद्धी वारी निघणार आहे.
या वारीमध्ये तेरा जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित राहणार आहेत. शिवाय राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह शक्तिपीठ विरोधी आंदोलनातील नेते उपस्थित राहणार आहेत.
शक्तिपीठ महामार्गाबद्दल अधिसूचना निघू दे किंवा संयुक्त मोजणी होऊ दे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही. 18 जुलै रोजी विठ्ठलाला साकडे घालण्यासाठी सद्बुद्धी दिंडीचे नियोजन करण्यात आले आहे. या दिंडीमध्ये 13 जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारनामाशी बोलताना दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.