Devendra Fadnavis  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maratha Reservation Decision : मराठा आरक्षणाच्या निर्णयावरील टीकेला फडणवीसांचे उत्तर... अर्धे लोक टीका करीतच असतात

Devendra Fadnavis Reaction : कालच्या निर्णयामध्ये ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत, त्यांना कायदेशीर पद्धतीने प्रमाणपत्र देणे आवश्यकच होते. परंतु, मिळत नव्हते, जो अधिकार होता. तो अधिकार आता सोप्या पद्धतीत केला आहे.

Vishal Patil

Satara News : राज्य सरकारने मराठा आरक्षणाची अधिसूचना काढल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपले मुंबईतील बेमुदत उपोषण मागे घेतले आहे. पण, त्या निर्णयानंंतर सरकारने फसविल्याचा आरोप होत आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ओबीसी समाजात वाटेकरी न करता मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. इकडचे-तिकडचे अर्धे लोक टीका करीत असताताच,’ असे सांगून त्यावर जास्त बोलणे टाळले. (Fadnavis's response to criticism on Maratha reservation decision)

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाटण तालुक्यातील मरळी-दौलतनगर येथे उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांच्या मुलाच्या लग्नासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षण आणि मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून होत असलेल्या नाराजीवर प्रतिक्रिया दिली. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, मंत्री गिरीश महाजन, आमदार महेश शिंदे, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. (Maratha Reservation Decision)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, तुम्ही काहीही केलं तरी टीका होतच असते. लोक टीका करीत असतात. अर्धे लोक इकडे टीका करतात, अर्धे लोक तिकडे टीका करतात. परंतु, आपल्याला महाराष्ट्रातील सगळ्या समाजाला न्याय द्यायचा आहे. मराठा, ओबीसी, धनगर या सर्व समाजाला न्याय द्यायचा आहे.

कालच्या निर्णयामध्ये ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत, त्यांना कायदेशीर पद्धतीने प्रमाणपत्र देणे आवश्यकच होते. परंतु, मिळत नव्हते, जो अधिकार होता. तो अधिकार आता सोप्या पद्धतीत केला आहे. कालच्या निर्णयात कोणालाही वाटेकरी न करता ओबीसी समाजाला 100 टक्के संरक्षण देऊन, मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे, असंही फडणवीस यांनी नमूद केले

ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही

ओबीसी समाजासह कोणत्याच समाजावर अन्याय न करता राज्य सरकारने सुवर्णमध्य काढला आहे. आम्ही छगन भुजबळ आणि नारायण राणे यांच्या या गोष्टी लक्षात आणून देऊ‌. या आरक्षणामुळे मराठा समाजाला फायदा होणार असून कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही. त्यामुळे भुजबळ यांनी चिंता करण्याचे काम नाही. आमचं सरकार काही झालं तरी ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन ओबीसी समाजाला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

आम्ही दिलेले मराठा आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं होतं. पण सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही. सर्वोच्च न्यायालयाने ज्या 3-4 कारणांमुळे आरक्षण फेटाळले, त्या कारणांची मीमांसा करणारा सर्व्हे सुरू केला असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Edited By : Vijay Dudhale

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT