श्रीरामपूर ( अहमदनगर ) : केंद्राने नवीन शेतकरी कायद्याचा मसुदा मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांना शेतकऱ्यांच्या संघटन शक्तीची ताकद कळाली आहे, अशातच महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेने अहमदनगर जिल्ह्यातील आगामी सर्व निवडणुकांत उतरण्याचा निश्चय केला आहे. या संदर्भातील माहिती शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ पाटील ( Raghunath Patil ) यांनी पत्रकार परिषदेत दिली. Farmers' Association Challenges Sugar Mills: Decision to Fight All Elections
श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृहावर काल सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष अॅड. अजित काळे, क्रांतिसिंह नाना पाटील, ब्रिगेडचे प्रांताध्यक्ष शिवाजी नांदखिळे, पश्चिम महाराष्ट्र विभागप्रमुख व राज्य ऊसदर समितीचे सदस्य बाळासाहेब पटारे, जिल्हाध्यक्ष अशोक पठारे, उपाध्यक्ष विलास कदम, तालुकाध्यक्ष अनिल औताडे, भास्कर तुवर, युवराज जगताप, शरद पवार, संदीप उघडे, मनोज हेलवटे, अॅड. सर्जेराव कापसे, अॅड. सर्जेराव घोडे, विष्णुपंत खंडागळे उपस्थित होते.
रघुनाथ पाटील म्हणाले, साखर कारखान्यांच्या आगामी निवडणुका शेतकरी संघटनेच्या बॅनरखाली लढविणार असून, जे आमच्यासोबत येतील, त्यांना बरोबर घेऊ. आगामी निवडणूक ही संघटनेच्या दृष्टीने क्रांतिकारी पाऊल ठरेल.
ते पुढे म्हणाले, की साखर कारखानदारीतील भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमता संपविण्यासाठी डॉ. सी. रंगराजन समितीने दोन साखर कारखान्यांतील हवाई अंतराची अट रद्द करावी, तसेच ऊसदरासाठी साखर कारखान्यांच्या महसुली उत्पन्नातील 70 टक्के हिस्सा शेतकऱ्यांना द्यावा आणि उर्वरित 30 टक्के रकमेत साखर कारखान्यांचा खर्च भागवावा, मात्र महाराष्ट्रातील साखरसम्राटांनी त्याउलट भूमिका घेतली.
दोन साखर कारखान्यांतील हवाई अंतराची अट 15 किलोमीटरवरून 25 किलोमीटर वाढविली. परिणामी, महाराष्ट्रात मागील सहा वर्षांत नवीन एकही साखर कारखाना उभारला नाही. त्यामुळे हवाई अंतराची अट रद्द करण्याची मागणी संघटनेने केली असल्याचे रघुनाथ पाटील यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.