कृषीमंत्री दादा भुसे बांधणार शेतकरी संघटना व सरकारमध्ये पूल

कृषीमंत्री दादा भुसेलवकरच राज्यातील सर्व शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांचे म्हणणे ऐकणार आहेत
Dada Bhuse to take meeting of Associations of Farmers
Dada Bhuse to take meeting of Associations of Farmers
Published on
Updated on

नाशिक : कृषी विभाग, त्या खात्याचे मंत्री आणि शेतकऱ्यांच्या संघटना यांचा छत्तीसचा आकडा असतो. शासनाच्या सर्वच निर्णयांवर प्रतिकूल मत व्यक्त करण्यात शेतकरी संघटनांचे पदाधिकारी क्षणाचाही विलंब लावत नाहीत. मात्र राज्यातील महाविकास आघाडीचे मंत्री दादा भुसे यांना हे चित्र बदलायचे आहे. त्यासाठी ते लवकरच राज्यातील सर्व शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांचे म्हणणे ऐकणार आहेत. असा प्रयोग पहिल्यांदाच होत असल्याने त्याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

महाराष्ट्रात माजी खासदार राजू शेट्टी यांची स्वाभीमानी शेतकरी संगटना, (कै) शरद जोशी यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटना, सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना, बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेशी संलग्न शेतकरी संघटना, किसान क्रांती मोर्चा, राष्ट्रीय किसान महासंघ, बळीराजा शेतकरी संघटना, रघुनाथ पाटील यांची संघटना अशा विविध प्रांतनिहाय शेतकरी संघटना कार्यरत आहेत. 

या संघटना लहान मोठ्या पन्नासहून अधिक संघटना विविध शेती प्रश्‍नांवर सरकारविरोधात सातत्याने टिका करत असतात. त्यामुळे त्यांच्या भावना समजुन घेऊन सरकारचे धोरण, सध्या सुरु असलेले कामकाज याबाबत माहिती देऊन या दोन्हींत समन्वय निर्माण करण्याचा कृषीमंत्री भुसेंचा हा पुढाकार आहे. असा प्रयोग पहिल्यांदाच कृषीमंत्र्यांकडून होत असल्याने त्यात नेमके काय होते याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com