FIR against teachers for census work sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

FIR On Teacher : सरकारी आदेशाला केराची टोपली दाखवणे पडले महाग; पाच शिक्षकांवर थेट गुन्हा दाखल

FIR against teachers for census work : लोणी काळभोर तहसील हद्दीत जनगणना २०२७ चा कार्यक्रम राबविण्यात येत असून, या कामासाठी संबंधित शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती.

Aslam Shanedivan

Pune News : केंद्र सरकारच्या जनगणनेच्या कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी लोणी काळभोर परिसरातील पाच शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे शैक्षणिक व प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तहसील प्रशासनाने आदेश देऊनही संबंधित शिक्षक जनगणना कामासाठी हजर न राहिल्याने अखेर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

याप्रकरणी ग्राम महसूल अधिकारी अमोल गव्हाणे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शिल्पा राजाभाऊ येरमाळकर, सुनिल दिलीप शेळके, शिवाजी संभाजी गायाकवाड, प्रदीप बबन पारधी व शन्नो जॉक्सन गगादे या शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर तहसील हद्दीत जनगणना २०२७ चा कार्यक्रम राबविण्यात येत असून, या कामासाठी संबंधित शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती.

चार्ज ऑफिसर तथा तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी शासनाच्या पोर्टलद्वारे तसेच पर्यवेक्षक अधिकाऱ्यांमार्फत संबंधितांना आदेश कळवले होते. मात्र, आदेश मिळूनही संबंधित शिक्षकांनी जनगणना कामकाजासाठी हजर राहण्यास टाळाटाळ केली आणि काम करण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे.

प्रशासनाच्या मते, जनगणना प्रक्रियेत अडथळा निर्माण करण्याच्या उद्देशानेच संबंधित शिक्षकांनी आदेश धाब्यावर बसवले. त्यामुळे अखेर ग्राम महसूल अधिकारी अमोल गव्हाणे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

त्याअनुषंगाने पाचही शिक्षकांविरोधात जनगणना अधिनियम १९४८ च्या कलम ११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT