Pune Census : धक्कादायक! जनगणना करणाऱ्या महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्याला मारहाण, जाब विचारायला गेलेल्या मुलालाही मारलं

Pune Census Worker Assault : या घटनेचा पीएमसी एम्प्लॉईज युनियनने निषेध केला असून, दहशतीमध्ये काम करणे शक्य नसून, जनगणनेच्या कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा युनियनने दिला आहे. शिवाय शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले होत असून, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी, अशी मागणीही युनियनने केली आहे.
Pune Census Worker Assault | Maharashtra Census Row
Pune Census Worker Assault | Maharashtra Census RowSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 29 May : सध्या देशभरात जनगणनेचं काम सुरू आहे. महाराष्ट्रात देखील जनगणना सुरू करण्यात आली आहे. या कामासाठी विविध सरकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये शिक्षकांसह विविध महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

मात्र, हेच जनगणनेचं काम करणाऱ्या एका महिला कर्मचार्‍याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरात घडली आहे. जनगणना करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला 5 ते 10 जणांकडून आधी शिवीगाळ आणि मग मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेच्या मुलालाही स्थानिकांकडून मारहाण करण्यात आली आहे.

पुण्यातील महर्षीनगरमध्ये ही घटना घडली असून या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 27 मे रोजी दुपारच्या सुमारास मीनाताई ठाकरे वसाहत या ठिकाणी जनगणनेच काम करत असताना आरोपी विकास मोरेंची पत्नी बहीण आणि पुतण्या या सर्वांनी जनगणनेच्या कामात अढथळा निर्माण करत संबंधित महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली.

Pune Census Worker Assault | Maharashtra Census Row
MLC Election : विधानपरिषद की मुलांचे राजकीय पुनर्वसन केंद्र, पुत्रप्रेम उफाळल्याने कार्यकर्ते उपेक्षित?

त्यानंतर महिला कर्मचारी पुन्हा त्या भागात जनगणना करण्यासाठी गेल्या असता त्यांनी आधी झालेल्या वादा संदर्भात मोरे कुटुंबीयांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, भांडणाच्या रागातून मोरे कुटुंबियांनी या महिलेला थेट लाथा बुक्क्या मारहाण केल्याची तक्रार संबंधित महिलेने पोलिसांमध्ये दिली आहे.

या महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी विकास मोरे, क्रांती मोरे, मुक्ता कसबे, लीलावती मोरे, अभिजीत मोरेंसह अनोळखी पाच महिला व पुरुषांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, सरकारी कामासाठी आलेल्या चक्क महिला कर्मचाऱ्यावर हात उचलल्याच्या घटनेवर नागरिकांसह जनगणनेचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Pune Census Worker Assault | Maharashtra Census Row
Tukaram Mundhe News: पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढेंचा दणका! 3 दिवसांत 53 छापे, 25 FIR, 33 जण तुरुंगात

दरम्यान, या घटनेचा पीएमसी एम्प्लॉईज युनियनने निषेध केला असून, दहशतीमध्ये काम करणे शक्य नसून, जनगणनेच्या कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा युनियनचे अध्यक्ष बजरंग पोखरकर यांनी दिला आहे. “शासकीय कर्मचाऱ्यांवर वारंवार हल्ले होत असून, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी,” अशी मागणीही युनियनकडून करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com