Census 2027 : SIR नंतर जनगणना शिक्षकांच्या जीवावर उठली : पुण्यात पहिला बळी; राज्यात आत्तापर्यंत 4 ठार

Census 2027 : जनगणना 2027 च्या कामासाठी जात असताना पुण्यातील शिक्षिका दीपाली तांबे यांचा अपघाती मृत्यू झाला. SIR प्रक्रियेनंतर जनगणना कामाशी संबंधित मृत्यूंची संख्या चारवर पोहोचल्याने शिक्षक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Pune teacher Deepali Tambe died in a road accident while travelling for Census 2027 duty, marking the fourth reported death linked to census enumeration work.
Pune teacher Deepali Tambe died in a road accident while travelling for Census 2027 duty, marking the fourth reported death linked to census enumeration work.
Published on
Updated on

Census 2027 : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या SIR प्रक्रियेनंतर जनगणना शिक्षकांच्या जीवावर उठली आहे. कोल्हापूर, सोलापूर आणि लातूरनंतर आता पुण्यात जणगणना करणाऱ्या महिला शिक्षिकेचा मृत्यू झाला आहे. दीपाली सुजीत तांबे असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. त्या मावळ तालुक्यातील अहिरवडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत होत्या. जनगणना कामासाठी जात असताना मावळ तालुक्यातील जुना पुणे-मुंबई महामार्गावरील कान्हे फाटा येथे भरधाव डंपरने त्यांच्या मोपेडला जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.  

तांबे यांचा जनगणना दरम्यानचा चौथा मृत्यू ठरला. यापूर्वी जनगणना कामातील 3 शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूरमधील भगवान पाटील, सोलापूरमधील सांगोला इथले राजाराम ढोले यांचा हृदयविकाराने, तर लातूरमधील सुंदरम वांगसकर यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. यापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या SIR प्रक्रियेदरम्यानही अनेकांचा जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत.

यापूर्वी पश्चिम बंगाल आणि बिहारमध्येही SIR प्रक्रियेदरम्यान अनेकांचे मृत्यू झाले आहेत. पश्चिम बंगाल सरकारने विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार, SIR प्रक्रियेदरम्यान मानसिक तणावामुळे 107 जणांचा मृत्यू झाले होते. नियम 169 अन्वये विधानसभेत याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. महाराष्ट्रातही SIR मोहिमेशी संबंधित उपजिल्हाधिकाऱ्यांनी अचानक बोलावलेल्या बैठकीला जाताना अपघात होऊन लोहगाव येथील एका प्राध्यापकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Pune teacher Deepali Tambe died in a road accident while travelling for Census 2027 duty, marking the fourth reported death linked to census enumeration work.
Mahayuti News: राष्ट्रवादीला अर्थखातं न दिल्यामुळे सुनेत्रा पवार भाजपवर नाराज? CM फडणवीसांचा दिल्लीतूनच मोठा दावा; म्हणाले...

10 लाख रुपयांच्या सानुग्रह अनुदानाची मागणी :

जनगणना करणाऱ्या प्रगणकांचा कर्तव्य बजावताना मृत्यू झाल्यास कुटुंबीयांस 10 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी कोल्हापूरमधील खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाने केली आहे. अनुदानासह कुटुंबीयांना अनुकंपाखाली नोकरी द्यावी, अशीही मागणी प्राथमिक शिक्षक महासंघांचे अध्यक्ष राजेंद्र कोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Pune teacher Deepali Tambe died in a road accident while travelling for Census 2027 duty, marking the fourth reported death linked to census enumeration work.
Corruption News : आमदारांची पत्नी, आणि भाजपच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप, पश्चिम महाराष्ट्र देवस्थानचे राजकारण पेटणार

शिक्षक संघटनांकडून SIR प्रक्रिया आणि जनगणनेदरम्यान शिक्षकांवर टाकण्यात येणाऱ्या अतिरिक्त कामाच्या ताणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शिक्षणाचे काम बाजूला ठेवून आधी निवडणुकीसंबंधित कामात गुंतवले आता उन्हाळी सुट्ट्यांमध्ये जनगणना कामासाठी जुंपले जात असल्याचा आरोप होत आहे. शिक्षकांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र विमा संरक्षण, प्रवास सुरक्षा आणि कामाचे स्पष्ट नियोजन करण्याची मागणी होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com