Chandrashekhar Bawankule Visit Subhash Deshmukh Home Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Subhash Deshmukh : फडणवीसांनंतर अवघ्या 14 व्या दिवशी भाजपच्या दिग्गज नेत्याची सुभाष देशमुखांच्या निवासस्थानी हजेरी!

Chandrashekhar Bawankule Solapur Tour : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी भेट दिल्याने सोलापूर भाजपच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 11 May : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर अवघ्या 14 व्या दिवशी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही माजी सहकार मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ आमदार सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी भेट दिली. या वेळी बावनकुळेंसोबत भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर आणि स्थायी समितीच्या अध्यक्षा रंजिता चाकोते होत्या.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी माजी मंत्री देशमुख यांच्या निवासस्थानी भेट दिल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे रविवारपासून (ता. 10 मे) सोलापूर (Solapur) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. रविवारी ते करमाळ्यात होते. त्यानंतर रात्री त्यांनी सोलापुरातील कार्यक्रमाला हजेरी लावली. बावनकुळे हे रविवारी रात्री सोलापुरातच मुक्कामी होती.

बावनकुळे यांनी आज सकाळी माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी भेट दिली. महसूल मंत्री बावनकुळे यांचे स्वतः सुभाषबापू यांनी स्वागत केले. स्वागतानंतर या दोघांमध्ये काही काळ चर्चाही झाली. या भेटीवेळी देशमुख यांचे दोन्ही चिरंजीव रोहन आणि मनीष देशमुख उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २८ एप्रिल रोजी सोलापुरात आले होते. त्या वेळीही बार्शीहून आल्यानंतर थेट कार्यक्रमाला जाण्याऐवजी मुख्यमंत्री हे होटगी रस्त्यावरील देशमुखांच्या घरी गेले होते. विशेष म्हणजे नियोजित दौऱ्यात नसतानाही फडणवीसांनी देशमुखांच्या निवासस्थानी भेट दिली होती.

फडणवीसांच्या भेटीनंतर अवघ्या १४ दिवसांनंतर भाजपचे बडे नेते मानले जाणारे बावनकुळे यांनी सुभाष देशमुख यांच्या घरी भेट दिली आहे. मुख्यमंत्र्यांसोबतही सुभाषबापू आणि त्यांच्या दोन्ही चिरंजीवांनी चर्चा केली होती. त्यानंतर काही दिवसांतच बावनकुळेंनीही देशमुख यांच्या घरी भेट दिल्याने मध्यंतरी महापालिका निवडणुकीच्या वेळी नाराज झालेल्या बापूंची नाराजी अजून गेली नाही की काय, अशी चर्चाही रंगली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीबाबात सुभाष देशमुख यांनी म्हटले आहे की, चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांचा स्वागतपर सन्मान केला. यावेळी त्यांच्याशी विविध सामाजिक, राजकीय तसेच जनहिताच्या विषयांवर सकारात्मक चर्चा केली.सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांप्रती संवेदनशील भूमिका घेत राज्याच्या विकासासाठी बावनकुळे सातत्याने कार्यरत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT