ranjitsinh mohite patil-dhairyasheel mohite patil-Jaykumar Gore Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gore on Dcc Victory : डीसीसीतील विजयानंतर गोरेंचा हल्लाबोल : मोहिते पाटलांचा फार पूर्वीच कार्यक्रम झालाय, त्यांनी आपला स्वाभिमान भीमेत नेऊन टाकलाय...

Solapur Dcc Bank Election Result : सोलापूर डीसीसी बँक निवडणुकीतील विजयानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोहिते-पाटलांवर टीका केली. त्यांना पराभवाची सवय झाली असून जनतेने त्यांचा खोटा स्वाभिमान ओळखल्याचे गोरे म्हणाले.

Vijaykumar Dudhale

Solapur, 27 November : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीतील विजयानंतर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पुन्हा एकदा मोहिते पाटलांवर हल्लाबोल केला आहे. मोहिते पाटलांना आता पराभवाची सवय झाली आहे. खोट्या स्वाभिमानाच्या गप्पा मारणाऱ्यांना जनतेने आता ओळखले आहे. त्यांनी आपला स्वाभिमान भीमा नदीत नेऊन टाकला आहे. मोहिते पाटलांचा फार पूर्वीच कार्यक्रम झालेला आहे. पुन्हा तो विषय येणार नाही, अशा शब्दांत गोरे यांनी टीकास्त्र सोडले आहे.

सोलापूर जिल्हा बॅंकेच्या १९ जागांपैकी १० जागा बिनविरोध झाल्या होत्या. त्या सर्व जागा भाजपच्या होत्या. तसेच उर्वरीत ९ जागांपैकी आठ जागा भाजपने जिंकल्या आहेत. त्यामुळे जिल्हा बॅंकेच्या १९ पैकी १८ जागांवर भाजपने दणदणीत विजय मिळविला आहे. त्या विजयानंतर पालकमंत्री गोरे यांनी मोहिते पाटलांवर कडक शब्दांत टीका केली आहे.

जयकुमार गोरे म्हणाले,कधी कधी एखाद्या गोष्टीची सवय लागते. आता त्यांना पराभवाची सवय लागलेली आहे. त्यामुळे खोट्या स्वाभिमानाच्या आणि जिल्ह्याच्या स्वाभिमानाच्या गप्पा मारणं, जिल्हा बुडवणं, जिल्ह्यातील सहकार बुडवणं, संस्था बुडवणं, हे आता जिल्ह्यातील जनतेने ओळखलेले आहे. त्यामुळे मोहिते पाटील यांनी आपला स्वाभिमान भीमा नदीत नेऊन टाकला आहे. आमच्यासोबत जिल्ह्यातील जनता आहे. जिल्हा बॅंकेला लागलेला डाग आम्ही या निमित्ताने धुवून काढू आणि मजबूत जिल्हा बॅंक उभी करू.

सोलापूर जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या पॅनेलला जनतेने भरभरुन आशीर्वाद दिले आहेत. जिल्ह्याची मुख्य अर्थवाहिनी योग्य लोकांच्या हाती देण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील जनतेने केलेले आहे. जिल्हा बॅंकेचे मतदार आणि जिल्ह्यातील माझे सर्व सहकारी यांचे मी मनापासून आभार मानेन, असेही गोरे यांनी नमूद केले.

ते म्हणाले, सोलापूर हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असल्याचे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत जनतेने भाजपला भरभरून आशीर्वाद दिले आहेत. त्याचीच पुनरावृत्ती जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत झाल्याचे दिसून येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT