

Solapur, 27 November : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निकालात सर्वाधिक चुरशीची लढत नागरी बॅंका आणि इतर संस्था मतदारसंघात पहायला मिळाली. शिवसेनेचे अमोल शिंदे यांनी माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव मनीष देशमुख यांच्यासमोर चॅलेंज उभे केले होते. ते शेवटच्या क्षणापर्यंत दिसून आले. मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यापासून या दोघांमध्ये चुरस दिसून आली. शेवटी मनीष देशमुख यांनी अवघ्या २९ मतांनी विजय मिळविला. पण शिवसेनेचे शिंदे यांनी विजयासाठी मनीष देशमुखांना शेवटच्या क्षणापर्यंत झुंजवले.
सोलापूर जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत नागरी बॅंका आणि इतर संस्था मतदारसंघात मोहिते पाटील यांच्या स्वाभिमानी शेतकरी पॅनेलमधून शिवसेनेचे नगरसेवक अमोल शिंदे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांनी माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव मनीष देशमुख यांना आव्हान दिले होते. भाजप आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असूनही मनीष देशमुख यांना विजयासाठी शेवटपर्यंत झुंजावे लागले.
नागरी बॅंका आणि इतर संस्था मतदारसंघासाठी ६०२ मतदान झाले होते. त्यातील ४ मते अवैध ठरली होती. त्यामुळे ५९८ मते वैध ठरली होती. या ५९८ मतांपैकी भारतीय जनता पक्षाचे मनीष देशमुख यांना ३१२, तर मोहिते पाटील पॅनेलचे अमोल शिंदे यांना २८३ मते मिळाली आहेत. श्रीधर कोंडले यांना ३ तर राजेंद्र गंगदे यांना तर भोपळाही फोडता आला नाही.
या मतदारसंघातून चौघे निवडणूक लढवत असले तरी खरी लढत मनीष देशमुख आणि अमोल शिंदे यांच्यातच झाली. अमोल शिंदे यांचे सोलापूर शहर, मंगळवेढा वर्चस्व दिसून आले, तर देशमुख यांचा प्रभाव मोहोळ, अक्कलकोट, बार्शीत दिसला. सोलापूर दक्षिणमध्ये बरोबरीत लढत सुटल्याचे स्पष्ट होत आहे.
माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे राजकीय वजन, सहकार क्षेत्रातील अनुभव, राजकीय वारसा, लोकमंगल बॅंकसारखे पाठबळ, संघटनात्मक ताकद असूनही मनीष देशमुख यांना सहकार क्षेत्रातील नवखे असलेल्या अमोल शिंदे यांनी घाम फोडला. भाजप नेत्यांकडे मतांचा गठ्ठा असूनही अमोल शिंदे यांनी पडलेली मते पाहता भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात दुफळी असल्याचे दिसून येते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.