Dr. Dilip Yelgaonkar
Dr. Dilip Yelgaonkar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara : सुरक्षा रक्षकांच्या हक्कासाठी डॉ. येळगांवकर मैदानात; स्वतंत्र कामगार भवन मंजूर

Umesh Bambare-Patil

Satara News : सातारा जिल्ह्यासाठी स्वतंत्र कामगार भवन आणि सुरक्षा रक्षक मंडळ कार्यालय मंजूर करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी नुकतेच दिले आहेत. त्यासाठी औद्योगिक वसाहतीतील व सदर बझार येथील एकूण चार जागा सुचविण्यात आल्या आहेत. या सर्व प्रस्तावांचा पाठपुरावा (कै.) नामदेवराव घाडगे सुरक्षा रक्षक मंडळ व जनरल कामगार युनियन यांच्या माध्यमातून केला आहे, अशी माहिती माजी आमदार डॉ. दिलीप येळगांवकर Dr. Dilip Yelgaonkar यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी (कै.) नामदेवराव घाडगे सुरक्षा रक्षक मंडळ व जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष अभिजीत येळगांवकर आणि सचिव रमेश जाधव उपस्थित होते. डॉ. येळगावकर म्हणाले,‘‘ जिल्ह्यात साखर कारखान्यांतील कामगारांना माथाडीचा दर्जा मिळत नाही. या कायद्याची स्पष्ट अंमलबजावणी न करण्यातच यंत्रणेने धन्यता मानली आहे. जिल्ह्यात २९५ सुरक्षा रक्षक असून, २०१९ पासून त्यांचा पगारच झालेला नाही.

सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यातील सुरक्षा रक्षकांचे एकच सांगली येथे कार्यालय आहे. सांगली जिल्ह्यात केवळ ८३ रक्षक आहेत. या कामगारांच्या पगाराचे चार कोटी २१ लाख ९३ हजार रुपये प्रलंबित आहेत. यावर आवाज उठवण्यासाठी आम्ही (कै.) नामदेवराव घाडगे सुरक्षा रक्षक मंडळ व जनरल कामगार युनियनची स्थापना केली असून, त्या माध्यमातून या प्रश्नाचा पाठपुरावा सुरू आहे.

कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या दालनात याबाबत बैठक होउन या विषयांवर तोडगा काढण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्यासाठी स्वतंत्र सुरक्षा रक्षक मंडळ कार्यालय व स्वतंत्र कामगार भवन आणि त्याच परिसरात ईएसआय हॉस्पिटल उभारण्याच्या संदर्भातील आदेश मंत्री खाडे यांनी दिले आहेत. काही जागा प्रस्तावित केल्या असून, यामध्ये सातारा एमआयडीसी येथील शासकिय दूध डेअरीची १७ एकर जागा तसेच येथील वीज उपकेंद्राच्या लगतची १५ एकर जागा सुचवली आहे.

या कार्यालयांच्या संदर्भातील कामांचे प्रस्ताव अंतिम होऊन लवकरच या कामांना सुरुवात होईल. सुरक्षा रक्षकांच्या नेमणुका यापुढे सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या माध्यमातूनच केल्या जातील. थेट सुरक्षा मंडळ आणि कामगार आयुक्त कार्यालय यांच्या माध्यमातून सुरक्षा रक्षकांच्या खात्यावर पगार जमा होणार आहे.’’ कामगारांना न्याय देण्यासाठी संघटना काढलेली आहे, आमच्याशी कोणी दोन हात केले तर आम्ही चार हात करु. आम्ही कोणालाही घाबरत नाही.या घटकाला न्याय देण्यासाठी टोकाला जाण्याची आमच तयारी आहे, असेही डॉ. येळगावकर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT