सांगली महापालिका निवडणुकीत भाजपमध्ये उमेदवारीवरून वाद उफाळला आहे
माजी नगरसेविका उषा पवार यांनी रक्ताने पत्र लिहून निषेध नोंदवला
या घटनेमुळे भाजपमधील अंतर्गत असंतोष चव्हाट्यावर आला आहे
Sangli News : राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणूका जाहीर झाल्या असून प्रतिक्रिया देखील सुरू झाली आहे. आता उमेदवारी भरण्याचा शेवटच्या कालावधीला ७२ तास शिल्लक राहिले आहेत. यादरम्यान महायुती सह महाविकास आघाडीत युत्यांच्यासह आघाड्यांवर चर्चा सुरू आहेत. तर काही ठिकाणी उमेदवाऱ्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
पण सांगलीत अद्याप महायुतीच्या जागावाटपांचे घोंगडे भिजत असून भाजपकडून उमेदवारीवर अद्याप निर्णय झालेला नाही. यामुळे येथे बंडखोरीची ठिणगी पडल्याचे दिसत आहे. सांगली महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 19 मध्येच भाजपच्या माजी नगरसेविका उषा अशोक पवार यांनी थेट भाजपचाच निषेध करत पक्षाकडून संवाद होत नसल्याचा आरोप केला आहे. यामुळे सांगलीच्या भाजपमध्ये वादाची ठणगी पडली आहे.
माजी नगरसेविका उषा पवार या उमेदवारीसाठी आग्रही असून त्यांनी प्रभाग क्रमांक 19 मधून दंड थोपाटले होते. त्यांनी येथे कामही सुरू ठेवले होते. पण येथे त्यांना भाजपकडून उमेदवारी डावलण्यात आली आहे. सध्यातरी अशाच चर्चा जोर धरत आहेत. अशाताच त्यांनी थेट पक्षाचा निषेध करत जोरदार टीका केलीय. त्यांनी पक्षाकडून योग्य संवाद साधला जात नसून लाडक्या बहिणीला डावलले जात असल्याचा दावा केला आहे.
तर या अन्यायाविरोधात स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिले असून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना देणार असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. उषा पवार यांनी सांगली महापालिकेत अनेक वेळा नगरसेविका आणि दोन वेळा सभापती म्हणून काम केलं आहे. त्यांनी प्रभाग 19 मध्ये मुलभूत गरजांसाठी लागणाऱ्या कामांचा निपटारा केला आहे. पण आता भाजपने त्यांना तिकीट नाकारले आहे. यामुळेच त्यांनी संताप व्यक्त करत पक्षाचा निषेध केला आहे.
दरम्यान आता त्यांनी आपल्या या भूमिकेवरून स्पष्टीकरण देताना, प्रभागात उमेदवारी डावलल्याची चर्चा जोर धरत असल्यामुळेच आपण हा कठोर निर्णय घेतला आहे. जनतेनं आपला स्वीकार केला असून भाजपच्या सर्व्हेतही आघाडीवर होतो. तरीही पक्षाने विचार केला नाही. पक्षाने अन्याय केला.
पण तो दूर व्हावा अशी आपली इच्छा असून यासाठीच स्वतःच्या रक्ताने पत्र लिहले असून ते राज्याचे मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांना देणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तसेच या पत्रानंतर पक्षाचे वरिष्ठ आपला नक्कीच विचार करतील आणि लाडक्या बहिणीला न्याय देतील असाही विश्वास दाखवला आहे.
Q1. उषा पवार यांनी रक्ताने पत्र का लिहिले?
👉 भाजपकडून उमेदवारी डावलल्याच्या निषेधार्थ त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.
Q2. हे पत्र कुणाला देण्यात येणार आहे?
👉 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना.
Q3. सांगली भाजपमध्ये अंतर्गत वाद आहेत का?
👉 उमेदवारीवरून नाराजी असल्याचे स्पष्टपणे समोर आले आहे.
Q4. या घटनेचा निवडणुकीवर परिणाम होईल का?
👉 स्थानिक स्तरावर भाजपची अडचण वाढण्याची शक्यता आहे.
Q5. भाजपने यावर अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे का?
👉 सध्या पक्षाकडून अधिकृत भूमिका आलेली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.