Dombivali Poltics : उद्धव ठाकरेंना धक्का, निवडणुकीच्याआधीच गटबाजी उसळली; डोंबिवलीत युवासेनेला भगदाड

Shivsena UBT Pratik Patil Resignation : निष्ठापूर्वक काम करुनही योग्य न्याय मिळत नाही. उलट पक्षपातीपणा आणि भेदभावाचा अनुभव येत आहे, असा हल्लाबोल प्रतिक पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर केला आहे.
Uddhav Thackeray  Pratik Patil
Uddhav Thackeray Pratik Patil sarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला डोंबिवलीत गळती लागली आहे. पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून कल्याण लोकसभेचे युवासेना जिल्हाधिकारी प्रतिक पाटील यांनी राजीनामा देत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. शिवसेनेचे नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना पत्रव्यवहार करत पाटील यांनी आपल्या पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

यापूर्वी ज्येष्ठ पदाधिकारी सदानंद थरवळ यांनी देखील निष्ठावंतांना डावलले गेल्याने नाराज होत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला रामराम ठोकला होता. पालिका निवडणूका जवळ आल्या असताना आता पक्षातील वरिष्ठांकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचे कारण देत युवासेना जिल्हा अधिकारी आणि त्यांच्यासोबतच सहा पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना ठाकरे गटातील दुर्लक्षित राहिलेल्या निष्ठावान पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या. पक्षातील आपली ताकद आणि स्थान दाखविण्याची नामी संधी त्यांच्यापुढे चालून आली. विधानसभा निवडणूकीच्या वेळी आपल्या पदरात तिकीट पडावे यासाठी अनेक इच्छुक पदाधिकाऱ्यांनी जोर लावला होता.

कल्याण लोकसभा क्षेत्रातील डोंबिवली विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळावी यासाठी निष्ठावान ज्येष्ठ कार्यकर्ते सदानंद थरवळ हे जोर लावत होते. मात्र एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलेल्या तत्कालिन जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. त्यांचा विधानसभा निवडणूकीत त्यांचा पराभव झाला असला तरी अल्पावधीतच त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनात स्थान निर्माण केले.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याशी देखील म्हात्रे यांचे पूर्वीपासून सलोख्य राहिले आहे. दिपेश यांच्या पक्षप्रवेशामुळे तसेच त्यांना उमेदवारी दिल्याने थरवळ यांनी पक्षाला रामराम ठोकत राजीनामा दिला. यानंतर कल्याण लोकसभा क्षेत्रात जिल्हाप्रमुख दिपेश हेच पक्षाचे सर्वेसर्वा झाल्याचे चित्र सध्याच्या घडीला आहे. विरोधी पक्ष म्हणून दिपेश हे चोख भूमिका बजावत असताना पक्षातील अंतर्गत नाराजीचा मात्र त्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

कल्याण लोकसभेचे युवासेना जिल्हा अधिाकरी प्रतिक पाटील यांनी राजीनामा दिला आहे. प्रतिक यांनी २००७ साली भारतीय विद्यार्थी सेनेचा शाखा संघटक, 2010 साली युवासेना स्थापनेनंतर उपविभाग अधिकारी नंतर तालुका अधिकारी आणि 2022 पासून कल्याण लोकसभा युवासेना जिल्हा अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.

Uddhav Thackeray  Pratik Patil
धक्कादायक! अल्पवयीन विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप? पडळकर बंधूंच्या कॉल डिटेल्सची शिवसेनेकडून मागणी

प्रतिक पाटील यांनी मांडली बाजू

शिवसेना युवासेनेचे विचार आणि ध्येय यावर माझा विश्वास होता. पक्षातील प्रत्येक कामगिरी मी चोख बजावली. 2009 पासून 2024 पर्यंत झालेल्या प्रत्येक निवडणूकीत पक्षाचा प्रचार व प्रसार केला. पक्ष बांधणीसाठी काम करताना अनेक सहकारी जोडले गेले त्यामुळे युवासेनेची ताकद वाढली. मात्र 2024 विधानसभा निवडणूकीनंतर मला व माझ्या सहकाऱ्यांना वरिष्ठांकडून सापत्न वागणूक मिळत असून तसेच संघटनेतील गटबाजीमुळे अत्यंत निराशा आली असल्याचे प्रतिक यांनी म्हटले आहे. निष्ठापूर्वक काम करुनही योग्य न्याय मिळत नाही. उलट पक्षपातीपणा आणि भेदभावाचा अनुभव येत आहे. यामुळे मी व माझे सहकारी राजीनामा देत असल्याचे प्रतिक यांनी म्हटले आहे.

यांनी दिला राजीनामा...

प्रतिक यांच्यासोबत डोंबिवली विधानसभा उपजिल्हा अधिकारी परेश काळन, कल्याण ग्रामीण विधानसभा समन्वयक पंकज माळी, उपतालुका अधिकारी आवेश गायकर, शहर अधिकारी प्रसाद दुकरुल, युवती शहर अधिकारी पायल शिंगोटे, युवर शहर समन्वयक ज्योती पाखरे यांनी राजीनामा दिला आहे.

Uddhav Thackeray  Pratik Patil
Marathi Hindi Controversy : "मराठी येत नाही म्हणून कुणी मारहाण केली तर लगेच..."; हिंदी-मराठी वादात राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांची उडी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com